कोल्हापूर

आंबेवाडीतील रिसॉर्टवरील छाप्यात साडेचार लाखाचा माल जप्त

CD

कोदेपैकी आंबेवाडीतील
रिसॉर्टवर पोलिसांचा छापा

३१ जणांवर गुन्हा ः साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त


गगनबावडा, ता.३१ : कोदे बुद्रुकपैकी आंबेवाडी (ता. गगनबावडा) येथील नयनील फार्म रिसॉर्टवर बुधवारी रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. यावेळी तोकड्या कपड्यात अश्लील नृत्य करणाऱ्या नृत्यांगनांसह पार्टी सुरू असल्याचे आढळले. यावेळी छाप्यात दारू, मोबाईल व अन्य साहित्य असा ४,५१,१०० रुपयांचा मुद्देमाल सापडला. कारवाईत मद्यधुंद अवस्थेतील तरुण, नृत्यांगना व दारू, पाणी व अन्य साहित्य पुरविणारे तसेच फार्म हाऊस मालक अशा एकूण ३१ जणांविरुद्ध गगनबावडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलिसांत गुन्हे दाखल झालेल्यांची नाव अशी, निखिल नंदकुमार सूर्यवंशी (वय ३८, रा. बलराम कॉलनी, ४ थी गल्ली, सुतारमळा, कोल्हापूर), रोहन जयसिंग निकम (वय ४०, रा. जयशंकर बगंला, बलराम हौसिंग सोसायटी, सुतारमळा, कोल्हापूर), हरिश लक्ष्मण चौगले (वय २८, रा.१०१२ बी वार्ड, रविवार पेठ, कोल्हापूर), मंगेश अशोकराव ढोबळे (वय ३५, रा. २०३२, बी वॉर्ड, मंगळवार पेठ, कोल्हापूर), जितेंद्र पांडुरंग पाटील (वय ४१, रा. २७०० बी वार्ड, मगंळवार पेठ, कोल्हापूर), अतिश अशोक हिराणी (वय ३४, रा. फ्लॅट नं बी १४, मनुस्मृती सोसायटी, टाकाळा चौक, कोल्हापूर), अमित रघुनाथ घोलप (वय ३८, रा. ४/१४ जाधववाडी, कोल्हापूर), सतीश शिवाजी पाटील (वय ३७, सरनोबतवाडी, ता.करवीर), मुद्तसर अस्लम रुकडीकर (वय ३८, रा. मोरे गल्ली, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले सध्या रा. सेक्टर नं ३, कोपरखैरणे, नवी मुंबई), गणेश दशरथ जाधव (वय ४०, रा. केळोशी बुद्रुक, ता. राधानगरी), रोहन संजय माळी (वय३३, रा. ४ थी गल्ली, जयसिंगपूर), शैलेंद्र सुरेश गोडबोले (वय ५०, धामणी रोड, सांगली), शेखर सुखदेव पाटील (वय३७, रा.२०४, महालक्ष्मीनगर, ढेबेवाडी, पुणे), सुहास दत्तात्रय घोरपडे (वय ३८), रोहीत नंदकुमार वीरभद्रे (वय ३८, रा. दोघीही हडपसर, पुणे), मोहन मारुतीराव हजेरी (वय ३६, रा. देहू रोड, मुकाई चौक, पिंपरी चिंचवड, जि. पुणे), किरण राजाराम सूर्यवंशी (वय ३८, रा. अरणबाग सोसायटी, नरेगाव, पुणे), राजवर्धन रमाकांत साळोखे (वय ३७, रा.७०२, निसर्ग सोसायटी, गोरेगाव (ईस्ट) मुंबई), यांच्यासह ९ नृत्यांगना, दारू, पाणी व खाद्य पुरविणारे परशुराम दगडू पाटील (वय२४), पांडुरंग बजरंग पाटील (वय २६), प्रकाश विलास पाटील (वय २३, तिघेही रा. कोदे बुद्रुक, ता. गगनबावडा) यांच्यासह विनापरवाना जागा दिल्याप्रकरणी रिसॉर्टमालक रूपेश सुर्वे (रा. मंगळवार पेठ कोल्हापूर) अशा ३१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी व गगनबावडा पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. कोल्हापूर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री जाधव, शाहूवाडी विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावडा सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलिस श्रीकांत मामलेकर, अमोल तेली, मानसिंग सातपुते, संदीप पाटील, सागर पाटील, दिगंबर पाटील, चालक अशोक पाटील इत्यादींचा पथकात समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19 चा विजेता, फरहाना भट्ट ठरली रनरअप

Mumbai: बीएमसीच्या प्रारूप मतदार यादीत मोठे बदल; चार वॉर्डमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ, तर २४ वॉर्डमध्ये घट

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT