कोल्हापूर

हुपरी परिसरात एकाच दिवशी दोन आत्महत्या

CD

हुपरी परिसरात
एकाच दिवशी
दोन आत्महत्या

हुपरी : परिसरात आज एकाच दिवशी आत्महत्येच्या दोन घटना घडल्या. दिव्या राजेंद्र पाटील (वय १८ रा. हुपरी रोड कमानी जवळ तळंदगे) व सुरेश आप्पासो आवळे (वय ३५ रा.आण्णा भाऊ साठे नगर चंदुर इंगळी) अशी आत्महत्या केलेल्यांची नांवे आहेत. या घटनांची हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
तळंदगे येथील दिव्या शिक्षण घेत होती. तिने राहत्या घरी छताच्या लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. घटनेची वर्दी निरंजन नेताजी पाटील यांनी दिली. इंगळी येथील सुरेशने पंचगंगा नदी किनारी असलेल्या सांगले यांच्या शेतात झाडाच्या फांदीला दोरीने गळफास लावून घेतल्याची घटना घडली. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या निदर्शनास आली. सुरेश हा दोन दिवसांपूर्वी रुई येथे आपल्या बहिणीकडे गेला होता. गेल्या काही दिवसांपासून तो नैरश्यग्रस्त होता. याची वर्दी अनिल आप्पासो आवळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palash Muchhal : "मी माझ्या आयुष्यात..." ; स्मृती मानधनासोबत लग्न रद्द झाल्यानंतर पलाश काय म्हणाला? कायदेशीर कारवाईचा इशारा...

Nagpur Winter Session: नागपूर अधिवेशनासाठी ‘रेड कार्पेट’! लोकभवन ते विधानभवन झळाळले, आठवडाभर गजबजणार उपराजधानी

Virat-Arshdeep Video: 'धावा कमी पडल्या, नाही तर आणखी एक शतक झालं असतं'' अर्शदीपच्या वाक्यावर कोहलीने दिलं मजेशीर उत्तर...पाहा व्हिडीओ

Latest Marathi News Live Update : मुंबई पुणे वरून येणाऱ्या विमानांची अनेक उड्डाण रद्द

धक्कादायक! बीडमध्ये घरात घुसून ग्रामरोजगार सेवकावर गावगुंडांचा जीवघेणा हल्ला; दुचाकीला बांधून चौकात नेले ओढत, लोखंडी रॉड घातला डोक्यात

SCROLL FOR NEXT