47112
...
मालिका ः उद्योग चक्राला गती भागः ३
...
जिल्ह्याचे औद्योगिक क्षेत्र वाढणार
सुमारे ९०० हेक्टरची भर पडणारः उद्योगवाढीला मिळणार चालना
संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः शाहूवाडी तालुक्यामधील डोणोली-आवळी आणि सातोळी पठार, शिरोळ तालुक्यातील आकिवाट-सैनिक टाकळी, करवीर तालुक्यातील विकासवाडी याठिकाणी नव्या एमआयडीसींचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाने राज्य शासनाला प्रस्ताव सादर केले आहेत. त्यावर शासनाकडून कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे औद्योगिक क्षेत्र वाढणार आहे. त्यात सुमारे ९०० हेक्टरची भर पडणार आहे.
शाहूवाडी तालुक्यातील एकूण ६४० हेक्टर जागेची पाहणी औद्योगिक विकास महामंडळाच्या भू-निवड समितीने या महिन्यात स्थळपाहणी पूर्ण केली आहे. डोणोली-आवळी, साताळी पठार, तुरकवाडी, नेर्ली, भेडसगाव, आकुळे, अमेनी या परिसरातील जागेची पाहणी समितीने केली असून त्याबाबतचा अहवाल उच्च अधिकार समितीकडे सादर होणार आहे. आकिवाट-सैनिक टाकळी येथील भूसंपादनाचा प्रस्तावाला उच्च अधिकार समितीची मान्यता मिळाली. शासनाने या एमआयडीसीसाठीची जागा औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाला दिला आहे. विकासवाडीमधील भूसंपादनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला आहे. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर औद्योगिक क्षेत्र वाढून त्याठिकाणी नव्या उद्योग उभारणी, विस्तार होवून उद्योगवाढीला चालना मिळणार आहे.
(समाप्त)
...
नव्या ‘एमआयडीसी’ची गरज का?
जिल्ह्यात सध्या शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित, गडहिंग्लज, आजरा, हलकर्णी या एमआयडीसी आहेत. या सर्व एमआयडीसींमध्ये गेल्या पाच वर्षांत एकूण २४६ भूखंडांचे वाटप औद्योगिक विकास महामंडळाने केले आहे. कोरोनानंतर नवे उद्योग सुरू करणे आणि सध्या कार्यन्वित असलेल्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी उद्योजकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्यात जागेची मागणी केली जात आहे. त्यांना जागा उपलब्ध करून देवून त्याव्दारे उद्योगवाढीला चालना देण्यासाठी शाहूवाडी, विकासवाडी, आकिवाट-सैनिक टाकळी येथे नव्या एमआयडीसींची गरज आहे.
...
कोट
‘कोरोनानंतरच्या सर्व आव्हानांचा सामना करत आता उद्योगक्षेत्र पूर्वपदावर आले आहे. उद्योग विस्ताराची नवी पावले टाकण्याची आम्ही उद्योजकांनी तयारी केली आहे. काही नवे प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याला बळ देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विकासवाडीसह इतर नव्या एमआयडीसी लवकर होतील याकडे राज्य शासन आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गांभीर्याने लक्ष द्यावे. उद्योगवाढीसाठी ते महत्त्वाचे ठरणार आहे.
-दिनेश बुधले, अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशन
...
प्रस्तावित एमआयडीसींचे क्षेत्र
शाहूवाडी ः ६४० हेक्टर
आकिवाट-सैनिक टाकळी ः७४.९४ हेक्टर
विकासवाडी ः २५४ हेक्टर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.