ich283.jpg
47845
तळंदगे : येथील जगन्नाथ मंदिरात अमृतधारा गीत मंचच्या वतीने भक्ती संगीताचा कार्यक्रम झाला.
जगन्नाथ मंदिरात भक्ती संगीत कार्यक्रम
इचलकरंजी : तळंदगे (ता. हातकणंगले) येथील जगन्नाथ मंदिरात अमृतधारा गीत मंचच्या वतीने भक्ती संगीताचा कार्यक्रम झाला. ग्रामदैवत जगन्नाथ मंदिरात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचा तेजोमय सोहळा बालकलाकारांनी बहरला. निमिष कुलकर्णी, कार्तिक सुतार, प्रणिती सुतार, स्वरा विभूते, दुर्वा कुंभार, तन्वी कुंभार, पूर्वा कुंभार, समीक्षा कुंभार आदी बालकलाकारांनी भक्ती गीतांसह गोंधळ गीत, गवळणी पहाडी आवाजात सादर करून रसिकांची दाद मिळवली. प्रशिक्षक सागर जोशी यांनी हार्मोनियम, सुधीर कुलकर्णी यांनी तबला, सुरेश जाधव यांनी ढोलकी, निवेदन प्रशांत कुलकर्णी, तर विनायक सुतार यांनी ताल वाद्यांची साथ संगत केली.
---------
न्यू हायस्कूलमध्ये पोस्टर प्रदर्शन
इचलकरंजी : दि न्यू हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान गौरव दिन सप्ताह साजरा केला जात आहे. विद्यार्थ्यांना सहजपणे संविधानाचे मूल्य, कर्तव्ये व अधिकार स्पष्ट व्हावेत, यासाठी पोस्टर प्रदर्शन भरवले. राष्ट्र सेवा दल स्मिता पाटील कला पथकातर्फे हर घर संविधान हे पथनाट्य सादर झाले. दामोदर कोळी, शरद वास्कर, वैभवी आढाव, रोहित दळवी आदी कलाकारांनी मुलांचे मनोरंजन करत संविधानाची ओळख सहज भाषेत करून दिली. अश्विनी राजमाने यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. प्रा. डी. महाले यांनी संविधानाचा परिचय करून देत संविधानाची गरज, महत्त्व, मूलभूत हक्क व त्यांची तत्त्वे पटवून दिली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. ए. कोळी होते. एस. एम. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सौ. लंबे यांनी सूत्रसंचालन केले. सौ. खेडकर यांनी आभार मानले.
----------
विनायक हायस्कूलमध्ये आरोग्य शिबिर
इचलकरंजी : विनायक हायस्कूल शहापूर येथे मुलींची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. हिमोग्लोबीन तपासणीसह त्याबाबत माहिती दिली. माधवी मराठे व असावरी शिंदे यांनी १५० विद्यार्थिनींची तपासणी केली. शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष हरिष मर्दा, परितोष गांधी, विनीत बलदवा, कमलेश लढ्ढा यांच्या उपस्थितीत झाले. मुख्याध्यापक अशोक हुबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
---------
हर्षदा पाटीलची निवड
इचलकरंजी : आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाची खेळाडू हर्षदा पाटीलची पश्चिम विभागीय विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आंतरविभागीय विद्यापीठ स्पर्धेत तिने ५५ किलो वजनी गटात १४९ किलो वजन उचलून प्रथम क्रमांक मिळवला. आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला प्राचार्या डॉ. त्रिशला कदम, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सविता भोसले, क्रीडा शिक्षक उत्तम मेंगणे यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.