‘शाहू’च्या विद्यार्थ्यांची क्रीडासह अन्य क्षेत्रांत भरारी
दोन महिन्यांत यशाचा वाढला आलेख ः शिवछत्रपती पुरस्कारासह नोकरीत विविध पदांना गवसणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी गेल्या दोन महिन्यांत विविध क्षेत्रांत यश मिळवले. यामध्ये आफ्रिद अत्तार, अन्नपूर्णा कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. आफ्रिद हा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागर प्रशांत पाटील जलतरण तलावावर सराव करणारा दिव्यांग खेळाडू आहे. अन्नपूर्णाला जलतरण खेळामधील कामगिरीबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला. अन्नपूर्णा हीसुद्धा दिव्यांग खेळाडू आहे.
सुबिया मुलाणीने नाशिक येथे झालेल्या राज्य वरिष्ठ अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत १०० मीटर फ्रीस्टाईल, २०० मीटर फ्रीस्टाईल, २०० मीटर वैयक्तिक पदके, १०० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात चार सुवर्णपदके पटकावली. आदित्य पवारची बंगळूर बुल्स संघाकडून प्रो कबड्डी सीझनन-११ खेळासाठी निवड झाली. शारीरिक शिक्षण विभागाची माजी विद्यार्थिनी ऋतुजा कडगले हिची शासनाच्या युवक व क्रीडा सेवा संचनालयाच्या मुंबई उपनगर कार्यक्षेत्राची जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून निवड झाली असून, ती सेवेत रुजू झाली आहे.
कालीरमण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार’ कृष्णा नेतलेला प्राप्त झाला आहे. कृष्णा हा स्केटिंगचा राष्ट्रीय खेळाडू आहे. एनसीसी विभागातील सिद्धेश माजगावकर, प्रथमेश कुरणेची भारतीय लष्करामध्ये निवड झाली. विनायक निकमची भारतीय लष्करात निवड झाली. याशिवाय पुढील आजी-माजी विद्याथ्यांची पोलिस दलात निवड झाली. शारीरिक शिक्षण विभागाची माजी विद्यार्थिनी शीतल पाटील हिची व अक्षय बनसोडे यांची कोल्हापूर पोलिस दलात, व्हॉलीबॉलमध्ये राष्ट्रीयस्तरावर चमकदार कामगिरी करणारा चेतन गोसावी सातारा पोलिस दलात, ओंकार नलवडे हाही पोलिस दलात भरती झाला. आशिष पाटील हा मीरा-भाईंदर येथील वसई विरार पोलिस आयुक्तालयात, सुजित पाटीलची कोल्हापूर शहर पोलिस दलात, अंकुश राठोडची कोल्हापूर ‘एसआरपीएफ''मध्ये पोलिस म्हणून निवड झाली. नीतू नाडारने एम.ए. परीक्षेत इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक मिळवला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा संगीता पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. आर. भोसले, सायन्स विभागाचे उपप्राचार्य प्रा. पी. एस. चौगुले, कला व वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. एम. के. कन्नाडे, डॉ. जी. एम. लवंगारे, डॉ. विक्रमसिंह नांगरे, डॉ. किशोर गायकवाड, प्रा. सविता माजगावकर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.