25745
इचलकरंजी : डॉजबॉल स्पर्धेत यश मिळविलेले गुरुकुल विद्यालयाचे विद्यार्थी.
जिल्हास्तरीय डॉजबॉल
स्पर्धेत ‘गुरुकुल’चे यश
इचलकरंजी, ता. १७ : क्रीडा व युवक सेवा संचानालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत गुरुकुल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश मिळविले. कोल्हापुरात झालेल्या या स्पर्धेत गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या १७ वर्षांखालील विद्यार्थिनी व १९ वर्षांखालील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर गुरुकुल विद्यालयातील १७ वर्षांखालील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक व १७ वर्षांखालील विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर १९ वर्षांखालील विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रशिक्षक सुनील चव्हाण, अमित बरगाले, अध्यक्ष गणेश नायकुडे, उपाध्यक्ष नविता नायकुडे, दोन्ही प्रशालांच्या मुख्याध्यापिका बालिका पाटील, रेवती मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.
.........
25747
इचलकरंजी : पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवावेळी क्रीडा ज्योतीचे प्रज्वलनप्रसंगी डॉ. चेतन नरके, संतोष शेळके, प्रा. ईश्वर.
पोदार स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव
इचलकरंजी, ता. १७ : पोदार इंटरनॅशनल स्कूलचा दहावा वार्षिक क्रीडा महोत्सव झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चेतन नरके, संतोष शेळके, प्रा. ईश्वर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच स्कूलच्या ध्वजवंदनाने झाली. विद्यार्थ्यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर स्वागतगीत, स्वागत नृत्य यासह विद्यार्थ्यांनी वर्गानुसार उत्कृष्ट नृत्य प्रदर्शन केले. यावेळी विविध स्पर्धा पार पडल्या. कार्यक्रमाचे निवेदन विद्यार्थी श्रेयांश केशवाटकर, वैभव पुरोहित व आद्या उर्ती यांनी केले. यावेळी समन्वयिका अमिता तोरस्कर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.