05577
वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेची
पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
वारणानगर, ता. ३१ : बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील डॉ. विनयराव कोरे वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रवींद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. नूथन संचालकांचा सत्कार आमदार विनय कोरे यांच्याहस्ते झाला.
बिनविरोध निवड झालेले संचालक असे ः दत्तात्रय नाथाजी जाधव, राहुल दिनकर जाधव, दिलीप गणपतराव जाधव, मनोहर धनाजी गायकवाड, रामराव भैरू जाधव, वसंत शामराव कावळे, अशोक नामदेव जाधव, सागर बाळासाहेब भोसले, नामदेव बापू बुवा, राजाराम भाऊसो गुरव, रूपाली उदय जाधव, लता पोपटराव जाधव. यावेळी वारणा कारखान्याचे संचालक रवींद्र आनंदराव जाधव यांनी संचालकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बहिरेवाडी जाखले पाणी पुरवठाचे संचालक उदय जाधव, आनंदराव जाधव विकास संस्थेचे संचालक अमेय जाधव, उपसरपंच राजाराम जाधव, युवराज भोसले, आनंदराव जाधव उद्योग समूहातील पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.