Mobile Company Outstanding In Jaysingpur Tower Sealdah Kolhapur Marathi News    
पश्चिम महाराष्ट्र

सावधान !  थकबाकीसाठी 'हा' टॉवर  होणार सील... 

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर (कोल्हापूर) : शहरातील एका कंपनीचा मोबाईल टॉवर थकबाकीसाठी पालिकेने शुक्रवारी सील केला. 1 लाख 39 हजार 501 रुपयांच्या थकबाकीसाठी पालिकेने ही कारवाई केली. पालिकेने वसुली मोहीम मुदतीनंतर आणखीनच गतिमान केली. दरम्यान, आजपर्यंत पालिकेने 49 टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट गाठले आहे. 

31 डिसेंबरअखेर थकबाकी भरण्याची मुदत होती. जानेवारीपासून दरमहा थकबाकीवर दोन टक्के दंड मिळकत धारकांना भरावा लागणार आहे. पालिकेच्या कर विभागाने सातत्याने थकबाकी जमा करण्याचे आवाहन मिळकत धारकांना केले होते; मात्र थकबाकी न भरलेल्या मिळकत धारकांची नळ कनेक्‍शन तोडण्याची कारवाई केली आहे. यातून साडेतीनशे नळ कनेक्‍शन तोडण्यात आली. 

हेही वाचा -अंत्यसंस्काराची तयारी झाली अन् मृत घोषित महिला उठून बसली... 

 साडेतीनशे नळ कनेक्‍शन बंद

शहरातील मोठ्या थकबाकीदारांवरही कारवाई केली जात आहे. शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पाच पथकांच्या माध्यमातून चाळीस अधिकारी आणि कर्मचारी वसुली मोहिमेत सहभागी झाले होते. मुख्याधिकारी टिना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी पवन म्हेत्रे, कर निरीक्षक प्रफुल्लकुमार वनखंडे, सहायक कर निरीक्षक प्रशांत तराळ, रमेश कांबळे, विशाल कांबळे, स्वप्निल भोसले, शिवाजी कांबळे, सचिन कांबळे, कुमार कांबळे, भरत सिद्धगणेश, सिद्धू मंटाळे, सचिन कुरणे आदी वसुली मोहिमेत सहभागी झाले होते.

 जादा दोन टक्के दंड आकारणार
जानेवारीपासून थकबाकीच्या दोन टक्के दंड मिळकतधारकांना भरावा लागणार आहे. दंड टाळण्यासाठी थकबाकीदारांनी लवकरात लवकर थकबाकी जमा करून सहकार्य करावे. 
-प्रशांत तराळ, सहायक कर निरीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT