लोणावळा, ता. १० : भगवान महावीर यांची जयंती लोणावळ्यात उत्साहात साजरी करण्यात आली. वरघोडा मिरवणूक, भंडारा, नवकार मंत्राचे पठण, भजन, व्याख्यान आदी धार्मिक कार्यक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आले.
लोणावळा गावठाण येथील वर्धमान जैन स्थानकवासी संघ आणि जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ यांच्या विद्यमाने भगवान महावीर जयंतीनिमित्त रांगोळी, थाळी सजावट स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात वरघोडा मिरवणुकीने झाली. गावठाण, जयचंद चौक, भाजीमंडई, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नवा बाजार अशी मिरवणूक काढत जैन स्थानकात समारोप करण्यात आला. यावेळी साध्वी प्रगती महाराजसा, जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ मॅनेजिंग ट्रस्टी गिरीश शहा, मांगीलाल जैन, मुकुंद शहा, संदीप शहा, प्रदीप पत्रावाला, ललित ओसवाल, महेंद्र ओसवाल, प्रवीण बोराणा, नवीन भुरट, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ अध्यक्ष कांतिलाल ओस्तवाल, सुभाष सांकला, संतोष चोरडिया, संतोष सुराणा, आशिष लुणावत, किशोर पारख, जितेंद्र छल्लानी, विनोद लुंकड, दिनेश गांधी आदी उपस्थित होते.
वळवण येथे नवकार मंत्रपठण
वळवण लोणावळा येथील चंद्रप्रभू जैन सकल संघ व महावीर जैन संघटना यांच्या वतीने भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त नवकार मंत्राचे सामूहिक पठण, महावीर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करत शोभायात्रा काढण्यात आली. वलवण जैन संघाचे छगनलाल परमार, प्रकाश चौहान, पोपट परमार, दीपक परमार, रमेश परमार, दिनेश चौहान, राजेंद्र चौहान, मुकेश परमार, राकेश बोराना, जीवन चौहान, आनंद परमार तसेच महावीर जैन संघटनेचे सूरज टाटिया, चिराग परमार, पुष्पत चौहान, निकुंज परमार, नीलेश परमार, अरविंद बोराना, निखील परमार, सनी परमार, रवी परमार, राकेश परमार, शुभम चौहान, अभिषेक परमार, धवल चौहान यांच्यासह अनेक जैन बांधव आणि भगिनी उपस्थित होते.
यावेळी स्व. देवराज बोराणा यांच्या स्मरणार्थ सरबत वाटप करण्यात आले. यासह वीरसेवक ॲनिमल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर आणि कुसगाव गोशाळेसाठी आर्थिक मदत करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.