पिंपरी-चिंचवड

पिंपरी कॉलेज कट्टा

CD

‘पुस्तक समीक्षे’तून
डॉ. कलाम यांना आदरांजली

शुभम जाधव/विद्या निकम (आयआयसीएमआर इन्स्टिट्यूट, निगडी)
निगडीतील आयआयसीएमआर इन्स्टिट्यूटमध्ये वाचन प्रेरणा दिन अर्थात दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त एनडीएलआय क्लबअंतर्गत ‘पुस्तक समीक्षा’ स्पर्धा झाली. याद्‍वारे ‘भारताचे मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. कलाम यांचा पुस्तक आणि ज्ञानाच्या माध्यमातून तरुणांना प्रेरणा देण्याचा वारसा आजही गुंजत राहत आहे. त्यांचे प्रतिकात्मक शब्द, ‘एक उत्तम पुस्तक शंभर चांगल्या मित्रांच्या बरोबरीचे असते आणि एक चांगला मित्र हा लायब्ररी सारखा असतो,’ याची जाणीव करून देण्यात आली. संस्थेचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी यांनी ‘पुस्तकांची पानं उलटा आणि स्वप्न प्रज्वलित करा’ हे प्रेरणादायी भाषण केले. ज्यामध्ये पुस्तकांची परिवर्तनकारी भूमिका आणि वाचन गंभीर विचार व कल्पनाशक्ती कशी वाढवते या बद्दल सांगण्यात आले. त्यांनी डॉ. कलाम यांचा विश्वास ‘वाचनामुळे स्वप्ने साकार होतात आणि आत्मविश्वास वाढतो’, हे सर्वांमध्ये प्रज्वलित केले. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनीही प्रेरणादायी पुस्तकांबाबत सांगितले. डॉ. सुधीर हसमनीस, रेणू मॅथ्यू, स्निग्धा शुक्ला उपस्थित होते.
(63310)

--
‘इंद्रधनुष्य’मध्ये सुवर्णपदक
(डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे राजभवन मुंबई संकल्पित राज्यस्तरीय युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०२४ उत्साहात झाला. या सांस्कृतिक स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या तेजस कांबळे याला पाश्चिमात्य गायनासाठी सुवर्णपदक मिळाले आहे. इंद्रधनुष्य २०१४ साठी कृषी आणि अकृषी मिळून एकूण २४ विद्यापीठातील पंधराशे विद्यार्थी कलाकार यामध्ये सहभागी झाले होते. तेजसला प्रभारी प्राचार्य डॉ. एम. डी. जगताप, उपप्राचार्य डॉ. एस. एन. पाटील. प्रा. अमृता कदम यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रिअल ॲडमिरल अमित विक्रम, संस्थेचे चेअरमन सतेज पाटील आणि विश्वस्त तेजस पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले.
(63309)
----
विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती
(इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी)
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी यांच्या निवडणूक साक्षरता क्लबने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील मतदानानिमित्त मतदार जागृती केली. विद्यार्थ्यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वतः पोस्टर्स तयार केले होते. महाविद्यालय आणि म्हाळसाकांत चौकात थांबून घोषणा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष खलाटे यांच्या मार्गदर्शनखाली मतदार जागृती कार्यक्रम घेतला. निवडणूक साक्षरता क्लबचे शिक्षक समन्वयक प्रा. प्रणव मुळे व कॅम्पस अँबेसिडर साईश्रवणकुमार रेड्डी यांनी नियोजन केले. विभागप्रमुख प्रा. अजित पतंगे, प्रा. पूजा प्रजापती, प्रा. प्रियांका जोशी, प्रा. अंकिता व्हटकर आदी उपस्थित होते.
(63311)
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकूल घोटाळा, जलील यांचा आरोप

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

SCROLL FOR NEXT