पिंपरी, ता. १७ : पिंपरी विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्याचा ध्यास असल्याचे प्रतिपादन पिंपरी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार ॲड. बी. के. कांबळे यांनी जाहीरनाम्यातून व्यक्त केला. त्यांनी जाहीरनाम्यात नमूद केले आहे की, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणार. जागेवरच घर बांधून देणार. दापोडीतील भाजी मंडईचे आहे, त्याच जागेवर पुनर्वसन करणार. शहरातील मुस्लिम बांधवांना स्मशानभूमी विस्तारीकरण करणार. शहराला जिल्ह्याची मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार. रिंग रेल्वेच्या जागेवर मेट्रो प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच विविध विकासकामांचा समावेश करण्यात आला.
फोटोः 63455
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.