पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

हिंजवडीतील लक्ष्मी चौकात वाहतूक कोंडी नित्याची
हिंजवडीतील लक्ष्मी चौक परिसरात अरुंद रस्त्यांमुळे नेहमी वाहतूक कोंडी होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अतिक्रमण हटविणे आवश्‍यक आहे. अपूर्ण पायाभूत सुविधा, रस्त्यांची खराब स्थिती आणि खराब झालेले ट्रॅफिक सिग्नल यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी वाढते.
-रमेश कटारिया, हिंजवडी
PNE25V67263

उद्यानात मोकाट कुत्र्यांचा वावर
उद्योगनगरी येथील मासुळकर कॉलनी परिसरात स्वीट मार्टच्या मागे इंदिरा गांधी उद्यान आहे. या उद्यानात वाहनतळा समोर मोकाट कुत्री असतात. त्यामुळे उद्यानात ये-जा करताना अडचण येत आहे. उद्यान विभागाने याची दखल घेत कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
-अरुण ओलवाझर, पिंपरी
: PNE25V67262

पदपथ आहे की स्नॅक सेंटर?
रावेत येथील पदपथावर स्नॅक सेंटर, त्यांचे फलक आणि दोन बाजूने पार्किंग असल्यामुळे चालणे कठीण होते. त्यामुळे दररोज मुलांना शाळेसाठी सोडायला वेळ लागतो. महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
-अश्विनी पाटील, रावेत
PNE25V67261

परिसर अस्वच्छ; रस्त्यांची दुरवस्था
पिंपळे निलख, जगताप डेअरी आणि समर्थ कॉलनी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच हा सगळा परिसर अस्वच्छ झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, त्यामुळे अपघातही होऊ शकतात. महापालिका प्रशासनाने या परिसराची स्वच्छता करून रस्त्यांची दुरुस्ती करावी.
साधू यादव, पिंपळे निलख
NE25V67260

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला आता कोणत्याही काळजीशिवाय रात्रीची ड्युटी करू शकतात! राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाहा संपूर्ण नियमावली

Chikhli Crime : चिखलीत कौटुंबिक तणाव हिंसक वळणावर; मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा!

Latest Marathi Breaking News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिलीच बैठक पार

Pune News : कचरा वाहतुकीची क्षमता वाढणार; अतिरिक्त आयुक्त पुनवीत कौर यांनी दिले आदेश

Thane Traffic: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कधी फुटणार? 'तो' दिवस ठरला!

SCROLL FOR NEXT