निगडीत सेवा रस्त्यावर वाहनांचे पार्किंग
भक्ती शक्तीकडून निगडी बस थांब्याकडे येणाऱ्या रस्त्यावर रिक्षा, चारचाकी टेम्पो व बसेस सेवा रस्त्यावर लावल्या जातात. अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे पादचारी जीव मुठीत धरून चालतात. एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी संबंधित विभागाने कारवाई करावी.
-संजय शाह, निगडी
PNE25V74889
रोहित्रामुळे अपघाताची शक्यता
महावितरणच्या नियोजन शून्य कारभारामुळे इंद्रलोक सोसायटीचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) सताड उघडे पडले आहे. आजूबाजूला लहान मुले खेळतात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अनेक वेळा महावितरणचे कर्मचारी येऊन जातात. दुरुस्ती करायला सांगितले तरी वर्षानुवर्षे दुरुस्ती होत नाही. तसेच डीपीची संरक्षक जाळी पण तुटली आहे.
-जगन्नाथ पांढरे, लिंक रोड, चिंचवड
PNE25V74888
पेव्हींग ब्लॉकचे काम रखडले
महापालिकेच्या ठेकेदाराचे मनमानी काम चालू आहे. सेक्टर २८ मध्ये अंतर्गत रस्त्याच्या बाजूच्या पदपथावरील पेव्हींग ब्लॉक बसवण्यासाठी जुने ब्लॉक महिनाभरापासून काढून ठेवले आहेत. नवीन ब्लॉक आणले आहेत. पण एक महिन्यापासून ठेकेदाराने काम चालूच केले नाही. स्थानिक पातळीवर विचारले असता, काम होईल चालू असे नुसते सांगितले जात आहे. ठेकेदारांना ना, अधिकाऱ्यांचा ना त्या भागातील राजकीय मंडळीचा धाक राहिला आहे. त्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
-प्रणय सावंत, प्राधिकरण
NE25V74887
वाकडला दत्त मंदिर रस्त्यावर खड्डा
वाकड येथील दत्त मंदिर रस्त्यावर पोस्टल कॉलनीजवळ वेलनेस मेडिकलसमोर रस्त्यावर मोठा खड्डा अनेक महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आला आहे. दत्त मंदिर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रात्रीच्यावेळी हा खड्डा न दिसल्यास अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. नुकतेच निगडी येथे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. याची महापालिकेने दखल घेऊन अपघात होऊ नयेत म्हणून महापालिकेने खड्डे दुरुस्त करून रस्त्यावर ठेवलेले दुभाजक, टाकाऊ साहित्य, बेवारस वाहने, भंगार साहित्य, लोखंडी गड॔र, राडारोडा स्वच्छ करून वाहतुकीस उपलब्ध करून देण्यात यावा.
- दिलीप बाफना, वाकड
-PNE25V74886
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.