पिंपरी, ता. २० ः शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या मोशीतील सावित्रीबाई फुले कन्या शाळा क्रमांक १०७ मध्ये ‘दप्तरविना शनिवार’ उपक्रम उत्साहात पार पडला.
याच दिवशी चालू शैक्षणिक वर्षासाठी शालेय मंत्रिमंडळ निवडण्यासाठी अभिनव अशी डिजिटल मतदान प्रक्रिया घेण्यात आली. त्यासाठी शिक्षिका अश्विनी सावळकर वाघमोडे यांनी विकसित केलेली संगणक प्रणाली वापरण्यात आली. यासाठी शिक्षक संदीप भालेकर यांनी सहकार्य केले. हे तंत्रज्ञान वापरताना पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून कागदाचा वापर करण्यात आला नाही. या निवडणुकीत पाचवी ते आठवीच्या ६१२ पैकी ४८३ विद्यार्थिनींनी मतदानाचा हक्क बजावला.
मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याध्यापिका सुरेखा अंबादास डांगे यांनी काम पाहिले. अमोल भालेकर यांनी संगणक व्यवस्थेची जबाबदारी पार पाडली. निवडणुकीचे कामकाज मुक्तार शेख, संतोष शितोळे आणि सोमनाथ शिंदे यांनी पाहिले.
शाळेची मुख्यमंत्री म्हणून स्वरा सचिन शिंदे निवडून आली. सायली सारूक, राधिका पवार हिच्यासह १२ उमेदवार निवडून आल्या. यावेळी पर्यवेक्षिका सुनीता गीते यांनी मार्गदर्शन केले. माया लोखंडे, पल्लवी सुरवसे, संतोष पन्हाळे, संतोष गवारे, उमेश सूर्यवंशी, नितीन गोडे आणि राजेंद्र सहकार्य केले.
---
या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान घेत नाहीत, तर त्यांना व्यावहारिक आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव होते. त्यातून जागरूक नागरिक बनण्यास मदत होते. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवात व्हावी व नेतृत्वगुण विकसित व्हावेत हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा यामागील उद्देश आहे.
- किरणकुमार मोरे, सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.