पिंपरी-चिंचवड

संवाद माझा (सुधारित)

CD

‘सेल्फी पॉईंट’ होऊनही कचरा
चिंचवडेनगरच्या कोपऱ्यावर कचरा टाकून घाण होते. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने स्वच्छता करून ‘सेल्फी पॉईंट’ केला. तरीही त्यासमोर लोक कचरा फेकून निघून जातात. अशा बेजबाबदार नागरिकांवर कडक कारवाई झाली पाहिजे.
- सुहास कुलकर्णी, शांतीबन सोसायटी, चिंचवड
PNE25V32832

विद्यानगरमध्ये पथदिवे बंद
गेल्या काही महिन्यांपासून विद्यानगर प्रभाग क्रमांक १० येथील पथदिवे बंद आहेत. रात्री या परिसरात खूप अंधार असतो. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू शकतो. विजेच्या खांबांच्या तारा खाली आल्या आहेत. जीवितहानी होऊ शकते. याविषयी महावितरणला अनेकवेळा कळविले. परंतु त्यांच्याकडून कार्यवाही झालेली नाही. महावितरणने आपली जबाबदारी लवकरात लवकर पूर्ण करावी.
- तुषार काशीद, चिंचवड
PNE25V32831

रिक्षा अनेक महिने पडून
पिंपळे निलखच्या विशालनगर परिसरातील डीपी रस्त्यावरील डॉमिनोज पिझ्झाच्या समोरील वाहनतळाच्या जागेत एक रिक्षा अनेक महिने पडून आहे. तिचे अनेक सुटे भाग काढून नेण्यात आले आहेत. या रिक्षामुळे वाहनतळातील जागा विनाकारण अडली आहे. त्यामुळे हा परिसर विद्रूप होत आहे. याविषयी सारथी अॅपद्वारे तक्रार केली आहे. मात्र कोणतीही कारवाई न करता तक्रार निकाली काढण्यात आली.
- हर्षवर्धन शेटे, पिंपळे निलख
PNE25V32830

आयुक्तांच्या आदेशाचे पालन करा
शहरात सातत्याने वाहतूक कोंडी होण्याचे मुख्य कारण म्हणजे रस्ता आणि पदपथावर असंख्य बेवारस, नादुरूस्त वाहने पडून आहेत. बेवारस वाहनांखाली कचरा, घाण जमा होऊन डासांची पैदास होते. बेवारस वाहनांवर कारवाई करून ती मोशी येथील महापालिकेच्या जागेवर ठेवण्याबाबत आयुक्तांनी २०२२ मध्ये आदेश दिला होता. त्यानंतरही अतिक्रमण विभाग ही बेवारस वाहने हटवित नाही. नागरिक जनसंवाद सभेत मुद्दा उपस्थित करतात. अधिकाऱ्यांना पत्राने कळवून किंवा प्रत्यक्ष भेटून विनंती करूनही कर्मचारी, बीट निरीक्षक दखल घेत नाहीत. त्यामुळे रस्त्यावरील बेवारस वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई करावी.
- दि. चं. बाफना, वाकड
PNE25V32834

तुटलेले चेंबर दुरूस्त करा
चिंचवडमधील चापेकर चौकातून जकात नाक्याकडे जाताना वाटेत शांतीबन सोसायटीजवळ मोठे चेंबर तुटले आहे. वर्दळीचा विचार करता केव्हाही गंभीर अपघात होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने चेंबरची लवकर दुरूस्ती करावी.
- रमेश पाटील, चिंचवड
PNE25V32833

पदपथावरील कचरा उचला
रावेतमधील शिंदे वस्ती चौकातील गणपती मंदिराजवळील कचरा पडून असतो. तो कधीही उचलला जात नाही. पदपथावर अनेक बेजबाबदार नागरिक कचरा टाकून जातात. शेजारी विद्येची देवता असलेल्या गणपतीचे मंदिर त्यांना दिसत नाही का ? असा प्रश्न पडतो. पीएमपीएल बस क्रमांक ३०७ चा थांबा आहे. चेंबरची जुनी गंजलेली जाळी तिथेच पडून आहे. पदपथावर वाहने आता दिसत नाहीत. त्याप्रमाणे कचऱ्याचा प्रश्नही सुटेल, हीच अपेक्षा.
- श्रीनिवास धोंगडे, रावेत
PNE25V32836

आकुर्डी स्थानकासमोर गुरुद्वारा चौकाकडील रस्ता बांधून फक्त दोन वर्षे झाली आहेत, पण त्यावर खड्डे झाले आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागाने तत्काळ दुरुस्त करावेत. त्याने कोंडी, अपघात होतात. अशा कामांसाठी ठेकेदाराकडून कोणतीही हमी घेतली जात

नाही का ?, किती वर्षे दुरुस्ती करावी लागणार नाही ? असे प्रश्न प्रशासनाला पडत नाहीत का ?
- विनय मोने, वाल्हेकरवाडी, प्राधिकरण
PNE25V32835

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Rummy Video : रमी नव्हे तर 'हा'गेम खेळत होतो… माणिकराव कोकाटेंनी काय दिलं स्पष्टीकरण?

Manikrao Kokate Rummy: कृषीमंत्री कोकाटेंच्या 'रमी' व्हिडिओनंतर ऑनलाईन गेमिंगवर बंदी येणार का? फडणवीस काय म्हणाले होते?

Ahilyanagar: डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री पवारांच्या हस्ते अनावरण: संग्राम जगताप; २७ जुलैला हाेणार अनावरण

WCL 2025 Video: क्रिकेटमध्ये पुन्हा बॉल-आऊट! द. आफ्रिकेने विंडीजवर मिळवला थरराक विजय

Mumbai News: अनधिकृत बांधकामाला अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन! न्यायालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाईची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT