Shivajirao Adhalrao Patil meet to cm eknath shinde devendra fadanvis with protesters for Satgaon Plateau water issue  sakal
पुणे

Pune News : सातगाव पठार पाणी प्रश्नासाठी उपोषणकर्त्यां समवेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार - शिवाजीराव आढळराव पाटील

मुंबई-आझाद मैदान येथे कळमोडी धरणातील पाणी सातगाव पठारासह शिरूर व खेड कोरडवाहू गावांना मिळावे.

डी. के वळसे पाटील

मंचर : “कळमोडी धरणातील पाणी सातगाव पठार (ता.आंबेगाव) परिसरातील शेतीला मिळावे. हा प्रश्न तातडीने सुटावा म्हणून शेतकरी बांधवांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

असे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. मुंबई-आझाद मैदान येथे कळमोडी धरणातील पाणी सातगाव पठारासह शिरूर व खेड कोरडवाहू गावांना मिळावे.

या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे माजी गटनेते देविदास दरेकर यांच्या नेतुत्वाखाली शेतकरी सोमवार (ता.२६) पासून उपोषणाला बसले आहेत. आढळराव पाटील यांच्या सह युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, प्रविण थोरात पाटील, डॉ.सुभाष पोकळे यांनी उपोषण कार्यकर्त्या बरोबर चर्चा केली. उपोषण कर्त्यांच्या भावना तीव्र होत्या.

“खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शेतकर्यांना वरदान ठरणाऱ्या कळमोडी प्रकल्पाला गती मिळण्यासाठी व डिंभे धरणातून बोगद्याद्वारे पाणी थेट नगर जिल्ह्यात नेण्याचा घाट घालणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी उपोषण सुरु आहे.” असे दरेकर यांनी सांगितले. “शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.”असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: मुंबईकर महिला भिडल्या... डब्यात सीटवरुन सुरु झालेला वाद पुढे मराठी विरुद्ध हिंदी पर्यंत पोहोचला, नंतर जे घडलं ते...

VIRAL VIDEO : बापरे! सोनू सूदने हातात साप पकडला अन्... व्हिडिओ व्हायरल

inspirational Story: 'जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर अंध नम्रता शिकली कॉम्प्युटर'; आई-वडीलांची भक्कम साथ

India Gate: इंडिया गेटवर पिकनिक बंद? काळजी करू नका, 'या' ठिकाणी कुटुंबासोबत करा मस्ती!

ENG vs IND, 4th Test: बुमराह-पंतच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; पण रैना म्हणतोय, 'जर भारताला मालिका जिंकायची असेल, तर...'

SCROLL FOR NEXT