पुणे

मांडवगणला घरफोडीचा प्रयत्न फसला

CD

मांडवगण फराटा, ता. २५ : मांडवगण फराटा(ता.शिरूर) येथे घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नातील घरफोडीचा प्रयत्न महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे फसला आहे. ही घटना बुधवारी (ता.२३) पहाटे चारच्या सुमारास घडली. काशिनाथ दरेकर यांच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांचा थरार कैद झाला आहे. चोरट्यांच्या हातात धारदार शस्त्रे असल्याचेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले आहे.
मांडवगण फराटा येथे काशिनाथ दरेकर हे पत्नी मुलगा, सून नातवंडे यांच्यासह राहतात.बुधवारी पहाटे चारच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील संरक्षक भिंतीवरून उड्या मारत अंगणात प्रवेश केला. दरेकर कुटुंब झोपेत असताना चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा कापून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आवाज आल्याने जयश्री दरेकर जागी झाल्या आणि मुलगा अभिषेक यांना हाक दिली. घराचा दरवाजा पूर्णपणे उघडण्यात चोरटे यशस्वी झाले होते. डोळ्यासमोर चोरटे दिसत असतानाही जयश्री यांनी दाखवलेल्या धाडसी वृत्तीने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांनी घरामागील गेटवरून उड्या मारत पळ काढला. अलीकडच्या काळात मांडवगण परिसरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी पोलिस गस्त वाढविण्याची आणि ग्रामसुरक्षा दल सक्रिय करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात घोटाळेबाजांचं आणि गुंडांचं राज्य, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; मविआची पत्रकार परिषद

HBA Scheme: आता घर घेणं सोपं होणार! केंद्र सरकार २५ लाख रुपयांपर्यंत कमी व्याजदराने गृहकर्ज देणार; पण कुणाला?

Thane Crime: केकमध्ये गुंगीचं औषध टाकलं अन्...; विवाहित महिलेसोबत दोन तरुणांचं विकृत कृत्य, ठाण्यात नेमकं काय घडलं?

Kashmir Video : काश्मीर 1947 नंतर कसे होते? काळीज हलवणारा 90च्या दशकातील ऐतिहासिक व्हिडिओ व्हायरल, डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही

Latest Marathi News Live Update : मुंबई पुणे वरून येणाऱ्या विमानांची अनेक उड्डाण रद्द

SCROLL FOR NEXT