पुणे

ज्ञानेश्वर विद्यालयाकडून अनाथाश्रमांना मदत

CD

आळंदी, ता. ३० : सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून ज्ञानेश्वर विद्यालयातील ‘विद्यार्थी सहाय्यक समितीच्या’ अंतर्गत ‘एक हात मदतीचा’ हा सामाजिक उपक्रम प्रतिवर्षी राबविला जातो. या माध्यमातून कोयाळीतील (ता. खेड) स्नेहवन अनाथाश्रम, मळवलीजवळील देवलीच्या (ता. मावळ) नैसर्गिक शिक्षा संशोधन व प्रशिक्षण संस्था यांना तब्बल ऐंशी हजार रुपयाच्या किराणा मालाची मदत केली. गेली आठ वर्षांपासून आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाच्या माध्यमातून उपक्रम सुरू आहे.
दरवर्षी वेगवेगळ्या अनाथाश्रम, वृद्धाश्रम, नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी पूरग्रस्त, कोरोना महामारी सारख्या ग्रस्तांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपली जाते. तीच मदतीची उज्ज्वल परंपरा याही वर्षी कायम ठेवत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर तसेच श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी यांच्यावतीने संस्था, सर्व विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी आपसांत आर्थिक रक्कम गोळा केली. जमा रकमेतून दोन्ही अनाथाश्रमांना प्रत्येकी चाळीस हजार रुपये किमतीचा किराणामाल सुपूर्त केला. तसेच प्रशालेतील स्वच्छता कर्मचारी असलेल्या चार मावशींना दीपावलीनिमित्त साडी भेट देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कोयाळीतील स्नेहवन अनाथाश्रमाचे बाबाराव देशमाने आणि नैसर्गिक शिक्षा संशोधन अनाथाश्रमाचे अल्हाद टपाले, ज्ञानेश्वर विद्यालयाचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार दीपक पाटील, संस्थेचे सदस्य योगेंद्र कुऱ्हाडे, शहाजी कर्पे, आनंद मुंगसे, जगदीश भोळे, अनिल वडगावकर, सदाशिव येळवंडे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यासाठी विद्यार्थी सहायक समितीच्यावतीने प्रज्ञा यादव, सूर्यकांत खुडे, रामदास वहिले यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी अल्हाद टपाले म्हणाले की, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत ज्ञानदानाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची व कर्तव्याची जाणीव करून देतात ही गौरवाची बाब आहे. तसेच केलेल्या मदतीबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. स्नेहवन अनाथाश्रम यांच्यावतीने माणिक काळे यांनी आपल्या अनाथाश्रमाची माहिती देत आपण केलेल्या मदतीमुळे अनाथाश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर येणारा आनंद हा सर्वांना समाधान देणार असल्याचे सांगितले व केलेल्या मदतीबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. अजित वडगावकर यांनी संत ज्ञानोबांच्या ‘दुरितांचे तिमिर जावो’ व संत तुकोबांच्या ‘जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले’ या उक्तीप्रमाणे संत विचारास अनुसरून ही संस्था काम करीत असल्याचे सांगितले. योगेश मठपती यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप काळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Video: वजन वाढेल माझं... रोहितचा केक भरवणाऱ्या जैस्वालला नकार; शेजारीच असलेल्या विराटची रिऍक्शन पाहिली का?

Mumbai Metro News: मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत! दोन मार्गिकांवर तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा खोळंबा

२४ रुपये रिफंडच्या नादात गमावले ८७ हजार; महिलेनं झेप्टोवरून केलेली ऑर्डर

Rajgad News : प्रशासन जागे; नागरिक खूश; सकाळ ऑनलाइन बातमी प्रकाशित होताच वेल्हे बुद्रुकमध्ये दोन हायमास्ट दिवे उभारले!

राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची पण..., विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं उत्तर; पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT