पुणे

जीएसटी दरकपातीचा सर्वसामान्यांना फायदा ः डॉ. राठी

CD

दौंड, ता. १६ : शासनाने जीएसटी दरांचे सुसूत्रीकरण केल्याने सर्वसामान्यांशी थेट निगडित अन्न, वस्त्र, निवारा, औषधे, आरोग्य व जीवन विमा संरक्षण, दुचाकी वाहने, कार, विद्यूत उपकरणे, पर्यटन, संबंधी वस्तू व सेवांचे दर कमी झाले. दरकपातीनंतर नागरिकांच्या हातात अधिक पैसा राहणार असल्याने व क्रयशक्ती वाढल्याने वस्तू आणि सेवांचा खप वाढण्यास सुरुवात होऊन सर्वसामान्यांना त्याचा फायदा होत आहे, अशी माहिती वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विभागाचे उपायुक्त डॉ. प्रवीण राठी यांनी दिली आहे.
दौंड शहरात रोटरी क्लब ऑफ दौंड, इंदापूर, भिगवण, सुपा, कुरकुंभ एमआयडीसी व पुरंदर क्लबच्या संयुक्त विद्यमाने जीएसटी सुधारणा आणि त्याचे व्यवसायावर परिणाम या विषयावरील मार्गदर्शनपर आयोजित केले होते. त्यामध्ये बोलताना डॉ. राठी यांनी ही माहिती दिली. जीएसटी विभागाचे सह आयुक्त सुधीर चेके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दौंड क्लबचे अध्यक्ष दीपक शासम, सचिव प्रज्ञा राजोपाध्ये, सनदी लेखापाल इशान नय्यार, रोटरीचे सहायक प्रांतपाल नरेंद्र गांधी, डॅा. राजेश दाते, रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसीचे अध्यक्ष गणेश लबडे आदी उपस्थित होते.
सुधीर चेके व डॉ. राठी यांनी छोट्या करदात्यांकरिता असलेली जीएसटी आपसमेळ योजना, कर विवरणे, संक्रमण काळासाठीचे नियम, ग्रामपंचायत संबंधी जीएसटी आकारणी आदी शंकांचे निरसन केले. अमीर शेख व सुषमा अडसूळ यांनी सूत्रसंचालन केले.

जीएसटी विभागाची सूक्ष्म नजर
संशयास्पद व्यवहारांवर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जीएसटी विभाग सूक्ष्म नजर ठेवून आहे. विभागाची अंतर्गत प्रणाली अद्ययावत असल्याने व्यापारी व नागरिकांनी कर वाचविण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करू नये. देय कर भरून निर्धास्तपणे व्यवसाय करावा, असे आवाहन सह आयुक्त सुधीर चेके यांनी केले.

04133

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa : नाइटक्लबचा मालक गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअर, २२ शहरं आणि ४ देशांमध्ये व्यवसाय; कोण आहे सौरभ लुथरा?

Maharashtra Weather: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना थंडीचा इशारा! हवामानविषयी दिली मोठी अपडेट, विभागानं नेमकं काय सांगितलं?

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री रेखा गुप्तांकडून दिल्ली एआय ग्राइंड लाँच

Agricultural News : 'एकरी पाच क्विंटल' जाचक अटीमुळे शेतकरी हैराण; सीसीआय खरेदीकडे कापूस उत्पादकांची पाठ!

टीआरपी कमी झाला की पटकन पात्राला मारून टाकतात... मालिकांबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचा रोखठोक सवाल

SCROLL FOR NEXT