पुणे

इंदापुरात शेती बी–बियाणे विक्रेत्यांचा बंद

CD

इंदापूर, ता.२८ : केंद्र सरकारने बी-बियाण्यांची विक्री ‘साथी पोर्टल’वरच करण्यात यावी याबाबत घेतलेल्या निर्णयास शेती बी बियाणे विक्रेत्यांनी विरोध दर्शवला आहे. इंदापूर येथील बी-बियाण्यांची विक्री करणाऱ्या दुकान चालकांनी मंगळवारी (ता.२८) एक दिवसीय बंद पाळत या निर्णयाला विरोध केला.
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे मिळावे, असा सरकारचा मूळ उद्देश आहे त्यामुळे केंद्र सरकारने ज्या पद्धतीने रासायनिक खत विक्रेते हे ‘पॉश मशिन’च्याव्दारे खतांची विक्री करतात त्याप्रमाणे आता बी बियाणे विक्री करताना ती साथी पोर्टलच्या माध्यमातून करावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.यामुळे बी-बियाणे विक्रेत्यांमधून नाराजी व्यक्त करीत विरोध केला जात आहे. कारण दर्जेदार बियाणेनिर्मिती करण्याची जबाबदारी ही बियाणे कंपन्यांची आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ''साथी पोर्टल''चा वापर बियाणे कंपन्यांच्या पातळीवर करणे खरी गरज आहे. त्यामुळे विक्रेत्यांना सक्ती रद्द करा, अशी मागणी महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस डीलर्स असोसिएशनची आहे.
त्यास अनुसरून इंदापूर तालुका सीड्स पेस्टीसाईडस् अॅण्ड फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशन कडूनही इंदापूर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अमोल भिसे, संजय दोशी, विठ्ठल पाटील, अनिल शहा, महेश अवताडे, गणेश शिंदे, लहू गाढवे आदी उपस्थित होते. तसेच सर्व विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवत केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19 चा विजेता, फरहाना भट्ट ठरली रनरअप

Mumbai: बीएमसीच्या प्रारूप मतदार यादीत मोठे बदल; चार वॉर्डमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ, तर २४ वॉर्डमध्ये घट

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT