पुणे

जेजुरीत यंदापासून जानाईदेवीची यात्रा

CD

जेजुरी, ता.२५ जेजुरीकरांची ग्रामदेवता असणाऱ्या जानाई देवीची शहरात पहिल्यांदाच यात्रा भरविण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. वर्षभर भाविकांची सेवेसाठी असणारे जेजुरीकर यंदा जानाईदेवी यात्रा भरणार आहे.
खंडोबा देवाच्या वर्षाकाठी मोठ्या आठ ते दहा यात्रा भरतात. जेजुरी शहराची अर्थव्यवस्था येथे येणाऱ्या भाविकांमुळे होणाऱ्या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे यात्राजत्रा वेळी जेजुरीकर नागरिक व्यवसायामध्ये गुंतले जातात. गावकरी व पंचक्रोशीतील नागरिकांना हक्काची जत्रा असावी, या जत्रेत धार्मिक विधी धार्मिक कार्यक्रम बरोबरच कुस्ती, तमाशा, बैलगाडा शर्यती आदी मनोरंजनाचा आनंद लुटता यावा या हेतूने जेजुरी नगरीची ग्राम दैवतं जानाईदेवीची यात्रा सुरू करण्याबाबत जानाईदेवी मंदिरात जानाई देवी मंदिर ट्रस्ट, श्री खंडोबा पालखी सोहळा ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जेजुरी शहरातील ऐतिहासिक होळकर तलावाकाठी जानाई देवीचे मंदिर आहे. हे मंदिर जीर्ण झाल्याने गेली चार वर्षे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून भव्य व ऐतिहासिक स्वरूप असणारे मंदिर उभारण्यात आले. मंदिरात जानाई देवीची नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होऊन कलशारोहण करण्यात आले. नवरात्र उत्सवात धार्मिक व देखणे कार्यक्रम साजरे झाले. जानाई देवीच्या यात्रा भरविण्याचा नियोजनासाठी ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. लवकरच जत्रेचे स्वरूप ठरविण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे सुधीर गोडसे यांनी सांगितले. यावेळी जानाई देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर गोडसे, खंडोबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे तसेच दोन्ही ट्रस्टचे पदाधिकारी राजेंद्र पेशवे, गणेश आगलावे, छबन कुदळे, संतोष खोमणे, माणिक पवार, पंडित हरपले, अप्पासाहेब बारभाई, रामदास माळवदकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची पण..., विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं उत्तर; पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

Interest Rate: खातेधारकांना दिलासा! RBI नंतर 'या' सरकारी बँकेकडून व्याजदरात कपात; पण किती टक्क्यांनी?

Ashes: गॅबा कसोटीत ड्रामा! स्टीव्ह स्मिथ चौकार - षटकार ठोकत जोफ्रा आर्चरला भिडला; वादाचा Video Viral

Maharashtra Politics: शिंदे–चव्हाण एकाच मंचावर; पण कोल्ड वॉर कायम! ‘म्हात्रे विरुद्ध म्हात्रे’ लढत तापली

IND vs SA: 'एक DRS माझ्यासाठीच आहे...', रोहित शर्माने उडवलेल्या खिल्लीवर अखेर कुलदीप यादव बोलला; पाहा Video

SCROLL FOR NEXT