जुन्नर, ता. २६ : श्री स्वामी समर्थ विसावा मंदिर, समर्थनगर- कुसूर (ता. जुन्नर) येथे शनिवारी (ता. २६) श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री स्वामी चरित्र सारामृत सामुदायिक पारायण करण्यात आले. यावेळी स्वामी भक्तांच्या वतीने विविध प्रकारच्या १५६ पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्याचे आयोजक तुकाराम महाराज दुराफे यांनी सांगितले.
मंदिरात सकाळी भूपाळी आरती आणि ॐ श्री स्वामी समर्थ जप तसेच श्री स्वामी समर्थ व दत्त मूर्तीस सामुदायिक अभिषेक आणि साईमाऊली पादुका पूजन करण्यात आले. मंदिरातील मूर्तींना चंदन लेप करण्यात आला. त्यानंतर पालखी सोहळा आणि औदुंबर प्रदक्षिणा झाली. दुपारी नैवेद्य आणि श्रींची महाआरती, महाप्रसादाचे आयोजन केले होते. मंदिरात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली होती. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. रात्री श्रींच्या महाआरतीने सोहळ्याची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.