शिक्रापूर, ता. १८ ः शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण चौकात पडलेले खड्डे अखेर बुजविण्यात आले आहेत. शिक्रापूर पोलिस, स्थानिक ग्रामपंचायत व अजिंक्यतारा सांस्कृतिक प्रतिष्ठान यांनी एकत्र येऊन चौकातील सर्व खड्डे मुरमाने तातडीने बुजविले आहेत.
खड्डे बुजविताना सार्वजनिक बांधकाम खात्याला निर्लज्ज म्हणत शिक्रापूरकरांनी आपला आंदोलनाचा इशारा कायम ठेवला. तसेच, पुणे- नगर महामार्ग महायुती सरकारकडून दुर्लक्षित- महामार्ग म्हणून जाहीर करण्याची मागणीही यावेळी स्थानिकांनी केली.
प्रत्येक पावसाळ्यात पुणे- अहिल्यानगर महामार्गावरील येथील चाकण चौकात इतके मोठे खड्डे पडतात की, त्यात दुचाकीचे सारखे अपघात होतात. यातील प्रत्येकजण आपापल्या परीने या अपघाताची नोंद कुठे न करता सरळ उपचार करून घेतात. चारचाकी वाहनांचीही अवस्था यावेगळी नाही. कारण या रस्त्यावरील पाण्यामुळे खड्डेच कळत नसल्याने लोक अक्षरश: हैरान आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कुणीही इकडे फिरकत नाहीत. पर्यायाने हा रस्ता दुर्लक्षित महामार्ग म्हणून घोषित करावा, अशी मागणीच येथील ग्रामस्थांनी केली आहे.
याच पार्श्वभूमिवर मंगळवारी (ता. १६) प्रश्नी वृत्त सकाळने प्रसिद्ध करताच येथील सरपंच रमेश गडदे, पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड आणि अजिंक्यतारा सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी तत्काळ सर्व रस्त्यांवर मुरूम टाकून खड्डे बुजविले. या काळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रतिनिधी साधे फिरकले नसल्याची माहिती तक्रारदार तथा शिक्रापूर टोल आंदोलनाचे कार्यकर्ते डॉ. धनंजय खेडकर व सचिन जाधव यांनी दिली.
सर्वपक्षीय झोपले आणि विरोधकही झाले मुके !
पुणे- अहिल्यानगर उड्डाणपुलाच्या घोषणा आणि गप्पा गेल्या काही वर्षात इतक्या आल्या आणि त्या हवेतच विरल्या. निवडणुकीपुरते दिसणारे सर्व सत्ताधारी आता या विषयी तर बोलतच नाहीत, उलट ज्या विरोधकांनी बोलायला हवे ते मुग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे शिक्रापूरकरांनी रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
04972, 04973
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.