पुणे

नारायणगाव सोसायटीतर्फे शेतकऱ्यांना नऊ कोटींचे कर्ज

CD

नारायणगाव, ता. १३ : ‘‘नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचा प्रारंभ शुक्रवारपासून (ता.११) करण्यात आले. पहिल्याच दिवशी पुणे जिल्हा बँकेच्या वतीने सोसायटीच्या ८५० सभासद शेतकऱ्यांना नऊ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे,’’ अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष संतोष खैरे यांनी दिली.
नारायणगाव सोसायटीच्या वतीने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचा प्रारंभ सोसायटीचे अध्यक्ष संतोष खैरे, उपसरपंच योगेश पाटे, जिल्हा बँकेचे विकास अधिकारी प्रसाद कोल्हे, नारायणगाव शाखेच्या व्यवस्थापिका जयमाला काळे, दादाभाऊ खैरे, संजय खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी उपाध्यक्ष किरण वाजगे, संचालक सीताराम खेबडे, राजेंद्र पाटे, कैलास डेरे, सीमा खैरे, रामदास तोडकरी, अरुण कोल्हे, चंद्रकांत बनकर, सचिव गणेश गाडेकर, विकास तोडकरी आदी मान्यवर व सभासद शेतकरी उपस्थित होते.

सोसायटीचे अध्यक्ष खैरे म्हणाले की, नारायणगाव ही तालुक्यातील मोठी सोसायटी आहे. सोसायटीच्या वतीने सुमारे ३२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप सभासद शेतकऱ्यांना केले होते. यापैकी ३१ मार्चअखेर सुमारे बारा कोटी रुपयांची पीक कर्जाची वसुली झाली.

व्यवस्थापिका काळे म्हणाल्या की, जिल्हा बँकेच्या नारायणगाव शाखेच्या अंतर्गत सहा सोसायट्या येतात. जास्त कर्ज पुरवठा करणारी नारायणगावची सोसायटी मोठी असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हा बँकेचे संचालक संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप सुरू केले आहे.

केंद्र शासनाच्या वतीने बहुउद्देशीय इमारत बांधकामासाठी नारायणगाव सोसायटीला निधी उपलब्ध झाला आहे. पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरू असून पुढील सहा महिन्यात सुमारे तीन कोटी खर्च करून सोसायटीची बहुउद्देशीय इमारतीचे काम पूर्ण केले जाईल. यामुळे पुढील काळात सोसायटीच्या उत्पन्न वाढीस चालना मिळणार आहे.
- संतोष खैरे, अध्यक्ष : नारायणगाव सोसायटी

06471

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकूल घोटाळा, जलील यांचा आरोप

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

SCROLL FOR NEXT