पुणे

‘रुग्ण सेवा करताना अडचण आल्यास दूर करू’

CD

नारायणगाव, ता. २५: ‘‘डॉ. भोसले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्जन डॉ. हनुमंत भोसले व त्यांच्या पत्नी मागील अनेक वर्ष ग्रामीण भागातील रुग्णांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या परिवारातील अनेक सदस्य वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. जनतेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ते मनापासून प्रयत्न करत आहेत. रुग्ण सेवा करत असताना कोणतीही अडचण आली तर अधिकार वाणीने सांगा. अडचण दूर करण्यासाठी सहकार्य करू,’’ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सर्जन डॉ. हनुमंत भोसले व त्यांच्या पत्नी डॉ. सविता यांनी २६ हजार चौरस फूट बांधकाम असलेल्या डॉ. भोसले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व सुविधायुक्त रुग्णालयाची नारायणगाव येथे उभारणी केली आहे. या हॉस्पिटलचे उद्‌घाटन पवार व जनाबाई भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. हनुमंत भोसले, डॉ. सविता भोसले यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील माजी आमदार अतुल बेनके , जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विश्वनाथराव भोपळे, डॉ. काशिनाथ भोपळे, राजेंद्र भोपळे, संपतराव वाघमोडे, सुनीता वाघमोडे, प्रतीक भोसले, आकाश वाघमोडे, उपसरपंच योगेश पाटे, डॉ.प्राप्ती, भोसले, डॉ. प्रदीप जोशी, डॉ.सत्यनारायण वडणे, डॉ. मोनाली क्षीरसागर, सपना क्षीरसागर, अभिजित क्षीरसागर, डॉ.सदानंद राऊत, डॉ.अनिल शेवाळे, डॉ. मनोहर कवडे, डॉ.शशिकांत गुळवे, डॉ.शशिकांत थोरात, डॉ.प्रसाद शिंगोटे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार अतुल बेनके मनोगत व्यक्त केले.
डॉ.भोसले म्हणाले की, मागील २१ वर्षांपासून सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा देत आहे. हृदय, मेंदू,छाती, पोट, मणके आदी विकारासह पंधरा हजार शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. हजारो अपघातग्रस्त रुग्णांना जीवदान दिले. डॉ. भोसले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तीन मॉड्युलर लॅमिनार ऑपरेशन थिएटर, फिजियोथेरेपी, डायलिसिस, अतिदक्षता, सोनोग्राफी, क्ष किरण, व्हेंटिलेटर, डीफॅब्रिलेटर, टू डी इको, पॅथॉलॉजी, निर्जंतुकीकरण, अग्निशामक प्रतिबंधक यंत्रणा, रुग्णवाहिका आदि शहरातील सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. विविध आजाराचे तज्ञ डॉक्टर २४ तास रुग्णसेवेसाठी तत्पर आहे. सूत्रसंचालन शरद दरेकर यांनी केले.

06651

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT