खेड शिवापूर, ता. १८ ः ससेवाडी (ता. भोर) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त नितीन माने, भोरचे गटविकास अधिकारी उदय जाधव व समन्वय अधिकारी धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व सरपंच पुनम लक्ष्मण गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करणे, पाणंद रस्ते विषयक मोहीम राबविणे याची माहिती महसुल विभागाच्या वतीने देण्यात आली.
अभियानाच्या प्रारंभी प्राथमिक शाळा ससेवाडी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी गावात प्रभात फेरी काढून जनजागृती केली. या फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये देत स्वच्छ, सशक्त व प्रगत गाव घडविण्याचे संदेश दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त माने यांनी, शासनाच्या महत्त्वाकांक्षी समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात होत आहे त्या मध्ये सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभागी होऊन आपले गाव स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी विजय कुलकर्णी, सोसायटी अध्यक्ष अशोक वाडकर, उपसरपंच रेखा जरांडे, सागर वाडकर, पुनम वाडकर, पोलिस पाटील अशोक गोगावले, तंटामुक्त अध्यक्ष अंकुश गोगावले, लक्ष्मण गोगावले, महेंद्र वाडकर, श्रीपती गोगावले आदी उपस्थित होते.
विविध उपक्रमांचा सहभाग
अभियान यशस्वी राबवण्यासाठी, सुशासनमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाची गुणवत्ता सुधारणे, प्रशासनिक आणि आर्थिक क्षमता वाढवणे, पाणी व्यवस्थापनाच्या उपाययोजना राबवून जलस्रोतांचे संरक्षण करणे, स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन आणि हरित क्षेत्रांच्या संवर्धन करणे, मनरेगा माध्यमातून रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकास साधणे, स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट सक्षमीकरण करणे, आदिवासी, मागासवर्गीय आणि इतर दुर्बल घटकांच्या उपजीविकेच्या संधी वाढवणे याचा उपक्रमात सहभाग असल्याचे गटविकास अधिकारी जाधव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.