पुणे

आंबेगावमधील १५७९३ बालकांना पोलिओ लसीकरण

CD

निरगुडसर, ता. १६ ः आंबेगाव तालुक्यातील १५ हजार ७९३ बालकांना ५५३ कर्मचाऱ्यांमार्फत २४५ बुथवर पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुषार पवार यांनी दिली.
आंबेगाव तालुका आरोग्य विभागाने नियोजन करत लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाना, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी येथे पोलिओ बूथ स्थापन केले होते. नागरिकांनी जवळच्या पोलिओ बूथवर आपल्या ० ते ५ वर्षे वयाच्या बाळाला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान पोलिओ लसीकरण केले.
गावाला गेलेल्या किंवा लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना घरगुती सर्वेक्षण करून मंगळवार (ता. १४) ते गुरुवार (ता. १६) या तीन दिवसांत लसीकरण करण्यात आले.
यावेळी बालकांना पोलिओचे डोस देण्याचे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुहास मैड, डॉ. रुबिना शेख, एल. एच. व्ही. अंकिता शिंदे, पुष्पा गुरव, रसिका गायकवाड, आशा सेविका यांच्या मार्फत लसीकरण करण्यात आले.

02898

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19 चा विजेता, फरहाना भट्ट ठरली रनरअप

Mumbai: बीएमसीच्या प्रारूप मतदार यादीत मोठे बदल; चार वॉर्डमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ, तर २४ वॉर्डमध्ये घट

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT