पुणे

काळवाडीत केळी क्लस्टरनिर्मितीचे शिबिर

CD

पिंपळवंडी, ता.२६ : काळवाडी (ता. जुन्नर) येथे केळी क्लस्टर निर्मिती शिबिराचे शुक्रवारी (ता.२५) आयोजन करण्यात आले होते. यावेळी केळी पिकास शासन मनरेगामधून हेक्टरी १९००० एवढे अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये कुशल व अकुशल अशी विभागणी करण्यात आली आहे. खड्डा खोदणे, पिकाला पाणी देणे आदी कामांसाठी प्रोत्साहन पर निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सांगितली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कृषी सहाय्यक दीपाली ढोले व डेक्कन व्हॅली एफपीसीचे सुनील वामन यांनी विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी आमदार सोनवणे यांच्या पत्नी सीमा सोनवणे, जुन्नरचे गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर, मंडळ कृषी अधिकारी राणू आंबेकर,सरपंच तुषार वामन, उपसरपंच, बाबासाहेब वामन. सुभाष विद्या मंदिराचे माजी प्राचार्य एम. डी. वामन, ग्रामोन्नती मंडळ अध्यक्ष महिंद्र वामन,पोलिस पाटील शुभांगी काकडे, सदस्य सोमनाथ वामन, माजी सरपंच अंजली वामन, डिसेंन्ट फाउंडेशनचे जितेंद्र बिडवई, आदिनाथ चव्हाण, डेक्कन व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीचे अजय बेल्हेकर, मनोज वामन आदी उपस्थित होते. समीर वामन यांनी सूत्रसंचालन केले तर आभार तुषार वामन यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT