पुणे, ता.२६ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्सच्या १६ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेला बुधवारी (ता.२६) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पुणे कॅम्प येथील सेंट व्हिन्सेंट्स, वानवडीचे क्रूट मेमोरियल, वडगाव येथील हेलिओस इंटरनॅशनल आणि एरंडवणेच्या सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूलने प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
‘सेंट व्हिन्सेंट्स’चा श्लोक मिथपेल्ली याने २, ‘क्रूट मेमोरियल’च्या विराज बाबरने एक गोल नोंदविला.
भारती विद्यापीठाच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू झाली. आंबेगावचे सिंहगड स्प्रिंग डेलने हिंजवडीच्या डॅफोडिल इंटरनॅशनलचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. स्प्रिंगडेलच्या अर्णव चौधरी, गौरंग शेखर यांनी प्रत्येकी दोन, तर प्रथमेश लवंगे याने एक गोल केला. मात्र पुढील सामन्यात ‘सिंहगड स्प्रिंगडेल’ला हेलिओस इंटरनॅशनलकडून चुरशीच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असा पराभव पत्करावा लागला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत स्प्रिंग डेलच्या ईशान जी. याने १८ व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र ‘हेलिओस’कडून परीक्षित मायी याने शेवटच्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीवर आणला. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटमध्ये सामना खेळविला गेला. तत्पूर्वी, हेलिओसने भारती विद्यापीठ स्कूलचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. भारती विद्यापीठ स्कूलच्या आदित्य सिंह व हेलिओसच्या निहार पाटील यांनी प्रत्येकी एक गोल करत सामना बरोबरीवर आणून ठेवला. पेनल्टी शूटआऊटमध्ये हेलिओसने भारती विद्यापीठ स्कूलवर ५-४ असा विजय प्राप्त केला. वानवडीच्या क्रूट मेमोरियलने केंद्रीय विद्यालय स्कूलवर १-० असा विजय मिळविला. विराज बाबर याने निर्णायक गोल करत संघाला पुढच्या फेरीत पोहोचविले. यानंतर झालेल्या सामन्यात एरंडवणेच्या ‘सेवासदन’ने वाकडच्या ‘इन्फेंट जीसस’चा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला.
सेंट व्हिन्सेंट्सकडून गोलांचा तडाखा
पहिल्या सामन्यात राहुल चौधरीच्या एकमेव गोलाच्या जोरावर न्यू टाइम्स इंटरनॅशनलने चिंचवडच्या नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलवर १-० असा विजय मिळविला. मात्र ‘न्यू टाइम्स’च्या दुसऱ्या सामन्यात ‘सेंट व्हिन्सेंट्स’ने ५-० असा दारुण पराभव केला. सेंट ‘व्हिन्सेंट्स’च्या परम भार्गव याने दुसऱ्या मिनिटाला पहिला गोल केला. श्लोक मिथपेल्ली याने १३ आणि १८ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. यासोबतच एथन लोबो व हसन इस्माईली यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.