पुणे

शिरूरमध्ये अशोक पवार यांचे सूक्ष्म नियोजन

CD

शिरूर, ता. ३१ : शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार ॲड. अशोक पवार यांच्या शिरूर शहर व परिसरातील प्रचाराचे सूक्ष्म नियोजन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले असून, शहरात प्रभागनिहाय प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी कार्यकर्त्यांची स्वतंत्र पथके सज्ज झाली आहेत. माहितीपत्रकाद्वारे आमदार पवार यांची विकासकामे मतदारांपर्यंत पोचवली जात आहेत.
शिरूर शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व कॉंग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार पवार यांच्या प्रचार यंत्रणेत सहभागी झाले असून, शहराच्या प्रत्येक भागात जाऊन नागरिकांच्या भेटीगाठींवर भर देण्यात आला आहे. आमदार पवार यांनी केलेल्या कामांची माहिती आवर्जून दिली जात आहे. उपनगरांतही संपर्क मोहीम राबविण्यात येत असून, ‘घर टू घर’ प्रचारावर भर देण्यात येत असल्याचे युवा नेते अमोल चव्हाण यांनी सांगितले. शहरातील सूरजनगर, जोशीवाडी, खारामळा, लाटेआळी, भाजीबाजार, फकीर मोहल्ला, अंडे बाजार, सोनार आळी, हलवाई चौक, सुभाष चौक आदी परिसर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पिंजून काढला. महिला भगिनी देखील प्रचार यंत्रणेत हिरिरीने सहभागी होताना दिसत आहेत.
सूरजनगर भागात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन विकासकामांची माहिती दिली. अमोल चव्हाण, दादाभाऊ वाखारे, भूषण लटांबळे, मोहन पवार, अशोक सोनवणे, साहिल गाडेकर, राजूद्दीन सय्यद, पल्लवी शहा, नवनाथ गरुड, मनीषा दळवी, बेबीताई शितोळे, तृप्ती लामखडे, साहिल बाचकर, आयुष सारडा हे प्रचार मोहिमेत सहभागी झाले होते.
नगरसेविका रोहिणी बनकर, नगरसेवक मंगेश खांडरे, माजी नगरसेविका संगीता शेवाळे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष किरण बनकर, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष हाफीज बागवान यांच्यासह शशिकला काळे, ज्योती हांडे, सुशांत कुटे, अर्शद शेख, कलीम सय्यद, राहील शेख, अर्शद शेख यांनीही विविध भागात जाऊन प्रचार यंत्रणा राबविली.

गेल्या तीन निवडणुकांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते तयार झाले असून, विकासकामांबरोबरच प्रत्येकाच्या सुख- दुःखात समरस होत आल्याने जनतेशी नाळ जुळली आहे. शिरूर व हवेलीतील जनतेच्या स्नेहबंधावर व प्रेमाच्या पाठबळावर निवडणुकीला सामोर जात असताना ही आशीर्वादरूपी ताकद इतकी प्रचंड वाढली की या सामान्य जनतेच्या या ताकदीचा सामना करण्याचे धाडस कुणात राहिलेले नाही.
- ॲड. अशोक पवार, आमदार, शिरूर- हवेली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Video: वजन वाढेल माझं... रोहितचा केक भरवणाऱ्या जैस्वालला नकार; शेजारीच असलेल्या विराटची रिऍक्शन पाहिली का?

Mumbai Metro News: मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत! दोन मार्गिकांवर तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा खोळंबा

२४ रुपये रिफंडच्या नादात गमावले ८७ हजार; महिलेनं झेप्टोवरून केलेली ऑर्डर

Rajgad News : प्रशासन जागे; नागरिक खूश; सकाळ ऑनलाइन बातमी प्रकाशित होताच वेल्हे बुद्रुकमध्ये दोन हायमास्ट दिवे उभारले!

राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची पण..., विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं उत्तर; पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT