पुणे

एसटी चालकाने मारला रिक्षाचालकाला दगड

CD

उरुळी कांचन, ता. २८ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे पुणे- सोलापूर महामार्गालगत एचपी कंपनीसमोर रिक्षा चालक आणि एसटी बस चालक यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून एसटी बस चालकाने रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना सोमवारी (ता. २७) सकाळी अकराच्या सुमारास घडली. हसन शमशेर पठाण (वय ४०, रा. इनामदारवस्ती, बाजार मळा रोड, लोणी काळभोर, ता. हवेली) असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. योगेश सिद्धेश्वर खडके (रा. भांडगाव, ता. दौंड) असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यानुसार सोमवारी (ता. २७) सकाळी अकराच्या सुमारास रिक्षा चालक हसन शमशेर पठाण हे रिक्षामधून (क्र. एम.एच. १२ व्ही. बी. ५०८७) भाडे घेऊन जात असताना पाठीमागून येणाऱ्या एसटी बसची (क्र. एम.एच. १४ बी.टी. २८१९) रिक्षाला धडक बसली. पठाण यांनी एसटी बस चालक खडके यास, ‘गाडी हळू चालवता येत नाही का? माझ्या रिक्षाला धडक का दिली?’ अशी विचारणा केली असता, ‘तुलाच गाडी नीट चालविता येत नाही का? तू काय भाई आहे का? मला गाडी चालवायला शिकवतो?’ असे म्हणून रिक्षा चालक पठाण यांना जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. एसटी चालक खडके याने एसटीमधील दगड रिक्षा चालक पठाण यांच्या डोक्यात घालून त्यांना जखमी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT