पुणे

दिल्लीचे तख्त राखू नका, तर राज्य करा

CD

नवी दिल्ली, ता. २५ : ‘दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा...’ असे आजवर आपण ऐकत आलोय. पण किती दिवस तख्त राखणार. महाराष्ट्राने आता दिल्लीच्या तख्तावर राज्य करायला हवे, असा सल्ला देशाचे माजी परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी ‘यिन’च्या सदस्यांना दिला.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) दिल्ली येथील केंद्रीय अधिवेशनाच्या उद्‍घाटन सत्रात ते बोलत होते. नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार, भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिती देवरे-चिखलीकर, ज्येष्ठ पत्रकार नवीन कुमार, ‘सकाळ’च्या दिल्लीचे ब्युरो चिफ विकास झाडे, यिनच्या केंद्रीय सभागृहाच्या सभापती दिव्या भोसले, उपसभापती अनिकेत बनसोडे आदी उपस्थित होते. लोकशाहीतील बदलाचे उत्तम साधन म्हणजे राजकारण असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असून, त्यांनी देशाला नवी दृष्टी द्यायला हवी. जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून दूर चाललेल्या राजकारणात तुम्हाला बदल घडवायचे आहेत. कारण महाराष्ट्र देशात बदल घडवतो आहे.’’ भारताचे संविधान जपले तरच स्वातंत्र्य, प्रज्ञा आणि प्रतिभा जपली जाईल.’’
वर्तमान राजकारणात मतभेदांपेक्षा मनभेद सर्वाधिक वाढल्याची खंत वानखेडे यांनी व्यक्त केली.
देशातील शिक्षणाचे खासगीकरण विघातक असल्याचे नवीन कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘खासगी विद्यापीठांची मागील काही वर्षांतील प्रगती बघता सर्वसामान्यांच्या हक्काचे शिक्षण मारले जात आहे. देशातील चांगली सरकारी विद्यापीठे बदनाम करण्याचे काम केले जात असून, समाजातील शेवटचा घटक शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.’’ ‘यिन’चे अधिकारी अनिकेत मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाबरोबरच अभ्यासू नेतृत्वाची परंपरा आहे. ‘यिन’च्या माध्यमातून ही परंपरा जोपासली जात आहे. केंद्रीय अधिवेशनामुळे अभ्यासू आणि धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या प्रक्रियेचा विद्यार्थी भाग बनत असून, निश्चितच यातून उद्याचे उज्ज्वल नेतृत्व विकसित होईल.
- धनंजय महाडिक, खासदार
....
आजच्या युवकांनी शासकीय योजनांची माहिती घेऊन, सरकार आणि सर्वसामान्यांमध्ये दुवा बनावे. तर खऱ्याअर्थाने मोठी सामाजिक क्रांती ठरेल. राज्यासह देशातील राजकारणात युवतींचा सहभाग वाढत असून, निश्चितच ही सकारात्मक बाब आहे. राजकारणात काम करत असताना स्वतःच्या पक्षाने घेतलेले निर्णय लोकांना पटवून देता आले पाहिजेत. अशा जागृतीतूनच सक्षम नेतृत्व उभे राहते.
- किरण साळी, प्रदेश सचिव, युवासेना

प्रश्न मांडण्यासाठी आणि सोडविण्यासाठी तरुणांनी जास्तीत जास्त राजकारणात यावे. राजकारण हे केवळ साध्य नसून, ते साधन ठरवावे. राजकारणात आपण नक्की कशाला जायचे आहे, हे निश्चित करा. देशाच्या ध्येयनिश्चितीसाठी युवकांनी राजकारणात यायला पाहिजे. कारण सळसळत्या रक्ताच्या युवकांमध्ये स्पष्ट निर्णय क्षमता असते.
- प्रणिता देवरे-चिखलीकर, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप महिला आघाडी

भारतीय राजकारणात खूप संधी आहेत. जगातील सर्व क्रांत्या युवकांनी केल्या असून, राजकारणात घराणेशाही फार काळ टिकत नाही. कर्तृत्व आणि नेतृत्वातूनच राजकारणी उदयास येतो. भविष्यात लोकसभेतील सदस्यसंख्या वाढत असून, तुमच्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी लोकप्रिनिधी म्हणून सभागृहात असतील.
- राहुल शेवाळे, खासदार
PCT23B12320

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Manager Work Pressure Death: खळबळजनक! बारामतीत 'Workload'मुळे बँक मॅनेजरने बँकेतच गळफास लावून दिला जीव

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे दोन तास एकाच हॉटेलमध्ये; भेट झाली नसल्याची सूत्रांची माहिती

BMC Election: निवडणुकीनंतर 14 गावे बाहेर काढणार; गौप्यस्फोट करत वनमंत्र्यांनी यादीच दिली

Karad News : विधीमंडळातील मारामारीप्रकरणी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा थेट सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

Rahul Gandhi: ''मोदीजी, 'त्या' पाच लढाऊ विमानांचं सत्य काय?'' राहुल गांधींकडून थेट निशाणा

SCROLL FOR NEXT