पुणे

अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज

CD

पुणे, ता. ४ ः कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा परिसरातील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे प्रशासन काटेकोर नियोजन करीत आहे. गतवर्षी राहिलेल्या त्रुटी दूर करण्यात येत आहेत. हिरकणी कक्ष, रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याचे टँकर यांची संख्या वाढविण्यात आली आहे. स्वच्छतेवर कटाक्ष असेल.
कार्यक्रमस्थळी आणि परिसरात दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा हिरकणी कक्ष उभारण्यात आले. याचा फायदा झाल्याच्या प्रतिक्रिया प्रशासनाकडे नोंदविण्यात आल्या. यंदा किमान सहा ठिकाणी हिरकणी कक्ष असतील. तेथे लहान मुलांसाठी खेळण्यांचीही व्यवस्था करण्याचेही नियोजन आहे. मातांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसही तैनात करण्यात येतील.
काही अनुयायी मुख्य कार्यक्रमाच्या आधीच विजयस्तंभला भेट देतात. त्यांच्यासाठीही काही सोईसुविधा उपलब्ध करण्यात येतील. यंदा ३९ रुग्णवाहिकांचे नियोजन करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरपाशी चालकाशिवाय एक व्यक्ती असेल. नागरिकांना कागदी ग्लास दिले जातील. ते टाकण्यासाठी त्याच ठिकाणी पिशव्या ठेवण्यात येतील.
---
अशी आहे व्यवस्था
- २८ बाह्यरुग्ण तपासणी केंद्र
- ८६ वैद्यकीय अधिकारी
- ३९ रुग्णवाहिका
- २० आरक्षित खासगी रुग्णालये
- २९१ खासगी रुग्णालयांतील आरक्षित खाटा
- ३३ हॉटेल आणि टँकर तपासणी पथके
- ६ टँकर भरणा केंद्र
- १९० पाण्याचे टँकर
- ११० टँकरची व्यवस्था असलेली ठिकाणे
- २००० फिरती शौचालये
----
प्रशासकीय व्यवस्था
- खासगी आणि शासकीय टँकर निश्चित करणार
- मुख्य कार्यक्रमाचे ठिकाण ते वाहनतळ तसेच रस्त्याच्या बाजूला टँकरची व्यवस्था
- प्रत्येक टँकरची तपासणी होणार
- कार्यक्रमाचे ठिकाण जोडणाऱ्या रस्त्यांची जिल्हा परिषदेकडून देखभाल-दुरुस्ती सुरू
- रस्ता, वाहनतळ आणि विजयस्तंभ परिसर स्वच्छ करण्यासाठी शंभर कर्मचारी तीन दिवस काम करणार
---
आरोग्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका, बाह्यरुग्ण तपासणी विभाग, दुचाकी रुग्णवाहिकाही कार्यक्रमस्थळी असतील. महिलांसाठी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग असेल. स्वतंत्र शौचालये असतील. गतवर्षीच बहुतांश त्रुटी कमी केल्या होत्या. तरीही आणखी सुधारणा होण्यासाठी पोलिस आणि गटविकास अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून शिरूर आणि हवेलीचे प्रांत अधिकारी नियोजन करीत आहेत.
- चंद्रकांत वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे दोन तास एकाच हॉटेलमध्ये; भेट झाली नसल्याची सूत्रांची माहिती

BMC Election: निवडणुकीनंतर 14 गावे बाहेर काढणार; गौप्यस्फोट करत वनमंत्र्यांनी यादीच दिली

Karad News : विधीमंडळातील मारामारीप्रकरणी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा थेट सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

Rahul Gandhi: ''मोदीजी, 'त्या' पाच लढाऊ विमानांचं सत्य काय?'' राहुल गांधींकडून थेट निशाणा

Narayangaon Crime : हॉटेलमधील जेवण पडले महागात! भाजीपाला व्यापाऱ्याची पाच लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबवली

SCROLL FOR NEXT