पुणे

विघ्नहर्ता पथकाकडून वंचितांची दिवाळी गोड

CD

पुणे, ता. ३१ : विविध मंडळे, कार्यक्रमांत ढोल-ताशा वादन करून नवरात्रोत्सवात जमा केलेला धान्यरुपी जोगवा दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक संस्थांना देऊन विघ्नहर्ता ढोल-ताशा पथकाने वंचितांची दिवाळी गोड केली. भोर वेळवंड येथील समर्थ विद्या प्रसारक मंडळी, वाघोली येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याणकारी संस्था या सामाजिक संस्थांना हा धान्यरुपी जोगवा देण्यात आला. शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ गणेश मंदिरासमोर शिधा प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष पराग ठाकूर, खडक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित पवार, कुमार रेणुसे, शिरीष मोहिते, महेश जगताप, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे, उमेश कांबळे आदी उपस्थित होते. तब्बल ९५० किलो धान्य संस्थांना देण्यात आले. पथकाचे अ‍ॅड. वृषाली जाधव-मोहिते, विराज मोहिते, गौरव देवकर, विद्या मोहिते, सचिन गायकवाड, निधी पोटे, उमेश चंद्रगी, सार्थक कामठे, अश्वजीत अष्टिगे, सिद्धेश्वर दळवी, रोहन भिल्लरकर आदींनी संयोजनात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accidental Gunshot Incident : धक्कादायक! शिकारीसाठी बंदूक रोखली झुडूप हालताच गोळी झाडली अन्, पुढे मित्र होता... नेमकं काय घडलं?

Maharashtra Weather Update : विदर्भात थंडीची लाट ! गोंदियाने महाबळेश्वरलाही टाकले मागे ; राज्यातील इतर भागांत कसे आहे हवामान? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : इंडिगो प्रकरणात कोणालाही सोडलं जाणार नाही- मुरलीधर मोहोळ

Yeola News : जीवघेणा नायलॉन मांजा! येवल्यात युवकाचा गळा चिरला, श्वासनलिकेला गंभीर दुखापत

इंडिगोतील गोंधळाचा फटका आमदारांनाही, नागपूरला अधिवेशानासाठी जाणाऱ्यांचं तिकीट रद्द; विमानतळावरही मोठा गोंधळ...

SCROLL FOR NEXT