चिंचवड येथील मारुती सुझुकीच्या एका शोरुमपासून सुरु झालेला वंडर कार्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवास आज नऊ शोरुमपर्यंत येऊन ठेपला आहे. गुणवत्ता, पारदर्शकता आणि ग्राहक सेवेच्या जोरावर कंपनीने आपल्या कार्याचा ठसा पुणे जिल्ह्यात उमटवला आहे. पुणे जिल्ह्यात ऑटोमोबाईल क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या वंडर कार्स प्रा. लि. कंपनीला आज एक जून रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त...
- घनश्याम अगरवाल,
संचालक, वंडर कार्स प्रा. लि. कंपनी
वंडर कार्सची स्थापना विजयकुमार अगरवाल आणि घनश्याम अगरवाल यांनी केली आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना ‘सेवा विथ व्हीजन या तत्वाला बांधील राहून कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात मैलाचा दगड रोवला आहे. वितरण हा कंपनीचा पाया असून, त्याद्वारे मारुती सुझुकीच्या सर्व मॉडेल्सच्या कार ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. गुणवत्ता, पारदर्शक व्यवहार आणि तांत्रिक प्रावीण्याच्या जोरावर कंपनीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनीचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात तीन अरेना, दोन नेक्सा, दोन कमर्शिअल आणि दोन ट्रू व्हॅल्यू शोरूम्स आहेत. तसेच चार सर्व्हिस सेंटर्स कार्यरत असून, नवीन सर्व्हिस सेंटर लवकरच वारजे येथे सुरु होणार आहे. याबरोबरच ट्रू व्हॅल्यू प्री-ओन्ड कार्स, ड्रायव्हिंग स्कूल्स आणि तांत्रिक प्रशिक्षण सुविधा देखील वंडर कार्स कंपनीकडून पुरविल्या जातात.
गेल्या दोन दशकांहून अधिककाळ वंडर कार्स ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत असून कंपनीने ‘ग्राहक प्रथम’ हे तत्त्व स्वीकारले आहे. २५ वर्षांच्या प्रवासात आम्ही आमच्या ग्राहकांचा विश्वास जिंकू शकलो, हेच आमचं सर्वात मोठं यश आहे. ‘सेवा विथ व्हीजन हे केवळ आमचं ब्रीदवाक्य नाही, तर आमच्या प्रत्येक कृतीचा मूलाधार आहे. आम्ही भविष्यातही नव्या उंची गाठण्याचा, नव्या सेवा उपलब्ध करून देण्याचा आणि ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न करत राहू.
तंत्रज्ञान अन् सेवांमध्ये बदल
गुणवत्ता, पारदर्शकता आणि तांत्रिक प्राविण्याच्या जोरावर वंडर कार्सने बाजारात स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन नवीन सेवा आणि सुविधा प्रदान करण्यासाठी कंपनी सज्ज असून भविष्यातही ग्राहकांचा विश्वास आणि दर्जेदार सेवा यांच्या जोरावर कंपनी यशाची नवी शिखरे गाठण्यास कटिबद्ध आहोत. रौप्यमहोत्सवानिमित्त ग्राहकांसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.