पुणे

स्वागत दिवाळी अंकाचे

CD

साप्ताहिक सकाळ
साहित्याची दर्जेदार मेजवानी
-----------------------
वाचनप्रेमींसाठी कलानुभूतीची सुंदर पर्वणी म्हणजे ‘साप्ताहिक सकाळ’चा दिवाळी अंक. मराठी साहित्यविश्‍वात मोलाची भर घालणारे लेख, कथा, कविता आणि मुलाखती या अंकात सामावल्या आहेत. बाळ फोंडके यांचा ‘सांग दर्पणा’ हा लेख नार्सिसिझमविषयी रंजक माहिती देतो. आशुतोष जावडेकर यांच्या ‘फेअरवेल मीनाताई’ या लेखातून लेखिका मीना प्रभू यांना वाहिलेली शब्दांजली वाचकांना नक्की भावूक करते. रोहन नामजोशींच्या ‘जेनझीकरण’ या लेखातून जेन झीच्या विश्‍वात डोकावता येतं. तन्मय कानिटकर यांच्या ‘लग्नातली लोकशाही अन् लोकशाहीतलं लग्न’ या लेखातून लग्नसंस्थेचे अतिशय वेगळे पैलू आपल्यासमोर येतात. इरावती बारसोडे यांनी आर्थर कॉनन डॉयलला लिहिलेल्या पत्रातून गुप्तहेरांच्या दुनियेची सफर होते. आपल्याला कवी, गीतकार आणि पटकथाकार म्हणून माहीत असणारे गुरू ठाकूर या अंकातून एक कथालेखक आणि चित्रकार म्हणूनही भेटतात. यासोबतच लक्ष्मीकांत देशमुख, योगिनी वेंगुर्लेकर, शिरीन म्हाडेश्वर, गौतम पंगू यांच्या कथा मनाला स्पर्शून जातात. प्रसिद्ध गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांच्याशी आरती संतोष करोडे यांनी गप्पा मारल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक-शहा यांची खास मुलाखत महिमा ठोंबरे यांनी घेतली आहे. यामधून त्यांच्या विचारविश्वाचा वेध घेतला आहे. वैभव जोशी, संदीप खरे, प्रवीण दवणे, प्रथमेश किशोर पाठक, मृणालिनी कानिटकर-जोशी, राधिका परांजपे-खाडिलकर यांच्यासह आणखीही बऱ्याच कवींनी गुंफलेले शब्द जणू दिवाळी अंकाची उंची वाढवली आहे. श्रीकांत इंगळहळीकर यांची ‘मी कृष्णा’ हा लेख उत्तम झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंचे दर्शन ‘प्रेरणास्त्रोत’ या लेखातून प्रशांत देशमुख यांनी घडवले आहे. दिल्लीतील साहित्य संमेलनावर संजय नहार यांनी दृष्टीक्षेप टाकला आहे. या साहित्यिक मेजवानीच्या सोबतीला निखळ मनोरंजन करणारी आलोक आणि निखिल विद्यासागर यांची हास्यचित्रे आहेत.
--------------------
अवतरण
‘आॅपरेशन सिंदूर’ची जागतिक मांडणी यावर श्रीकांत शिंदे यांचा लेख आहे. ‘आॅपरेशन सिंदूर’ दहशतवाद थांबवणार का? यावर विनोद राऊत यांनी भाष्य केले आहे. युद्धविरहीत जगाची संकल्पना यावर संदीप वासलेकर यांनी प्रकाशझोत टाकला आहे. ‘युद्ध नैतिकचा राजा’ या विषयावर श्रीमंत कोकाटे यांनी मांडणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola : गावच्या पाण्याच्या टाकीतून थेट घराला आणि शेतीला पाणी नेलं, १५ वर्षे पाणीचोरी; ठाकरेंच्या नेत्यावर गुन्हा दाखल

IND vs SA: विराट कोहली नाही, तर 'या' खेळाडूला भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये मिळाले Impact Player चे मेडल; BCCI ने शेअर केला Video

Latest Marathi News Live Update : 'मी येतोय जनतेच्या सेवेसाठी' ,सचिन दोडके यांच्या फ्लेक्समुळे पक्षांतराच्या चर्चा रंगल्या

IndiGo Crisis : इंडिगोचे संकट अजून संपलेलं नाही ! दिल्लीतून सहाव्या दिवशी १०० उड्डाणे रद्द, प्रवाशांचा मनस्ताप

राज्यात घोटाळेबाजांचं आणि गुंडांचं राज्य, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; मविआची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT