पुणे

‘सीएसआर’मधून आरोग्य व्यवस्थेला नवी ऊर्जा

CD

पुणे, ता. २५ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्‍या नव्या धोरणानुसार, सामाजिक उत्‍तरदायित्‍व निधी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी-सीएसआर)चा वापर आता थेट राज्याच्या आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी केला जाणार आहे. या नव्या धोरणानुसार मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय येथे स्वतंत्र ‘सीएसआर’ कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कक्ष विविध कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योग समूहांकडून मिळणाऱ्या निधीचे नियोजन, वापर आणि पारदर्शक मूल्यांकन पाहणार आहे.
या नवीन धोरणानुसार, प्राप्त निधीचा वापर ग्रामीण व शहरी आरोग्य सुविधा उभारणी, झोपडपट्टी आरोग्यसेवा, महिला व बालकल्याण केंद्रे, वैद्यकीय संशोधन, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी केला जाईल. या उपक्रमामुळे आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत होण्यासोबतच स्थानिक रोजगारनिर्मितीच्या संधी वाढतील. धोरणात नमूद केल्याप्रमाणे, प्रत्येक ‘सीएसआर’ प्रकल्पाची छाननी राज्यस्तरीय समिती करेल. ही समिती प्रस्तावांची तपासणी, देणगीदार संस्थांशी समन्वय, निधीचा उपयोग आणि त्याचे मूल्यांकन या सर्व बाबी पाहणार आहे.
आरोग्य विभागातील वरिष्‍ठ अधिकाऱ्याने दिलेल्‍या माहितीनुसार, ‘सीएसआर निधीचा वापर केवळ आरोग्यविषयक प्रकल्पांसाठीच केला जाईल आणि तो केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच असेल. या धोरणामुळे खासगी कंपन्या आणि शासन यांच्यात आरोग्य क्षेत्रात भागीदारी निर्माण होईल. या निधीच्या माध्यमातून ग्रामीण आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य सुविधा, तसेच मातृ–बाल आरोग्य प्रकल्पांना नवे बळ मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची पण..., विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं उत्तर; पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

Interest Rate: खातेधारकांना दिलासा! RBI नंतर 'या' सरकारी बँकेकडून व्याजदरात कपात; पण किती टक्क्यांनी?

Ashes: गॅबा कसोटीत ड्रामा! स्टीव्ह स्मिथ चौकार - षटकार ठोकत जोफ्रा आर्चरला भिडला; वादाचा Video Viral

Maharashtra Politics: शिंदे–चव्हाण एकाच मंचावर; पण कोल्ड वॉर कायम! ‘म्हात्रे विरुद्ध म्हात्रे’ लढत तापली

IND vs SA: 'एक DRS माझ्यासाठीच आहे...', रोहित शर्माने उडवलेल्या खिल्लीवर अखेर कुलदीप यादव बोलला; पाहा Video

SCROLL FOR NEXT