सध्याच्या धावपळीच्या युगात इन्स्टंट फूडला बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे. हे लक्षात घेऊन इन्स्टंट मसाले, प्रीमिक्स व चटणी तयार करण्यास शिकवणारी दोन दिवसीय प्रात्यक्षिकांवर आधारित कार्यशाळा १५ नोव्हेंबरपासून आयोजिली आहे. रेडी टू कूक मसाले आणि ग्रेव्ही यामध्ये इन्स्टंट पनीर मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मिसळ मसाला, महाराष्ट्रीय ग्रेव्ही, हैदराबादी ग्रेव्ही, व्हाइट ग्रेव्ही, मालवणी ग्रेव्ही, फिश फ्राय मसाला, चायनीज ग्रेव्ही, जैन स्पेशल ग्रेव्ही, चायनीज ग्रेव्ही हे पदार्थ शिकवले जातील. इन्स्टंट रेडी टू कुक मसाले व नावीन्यपूर्ण ग्रेव्ही यामध्ये इन्स्टंट पीठे व प्रिमिक्स शिकवले जातील ज्यामध्ये डोसा, इडली, गुलाब जामुन, आइस्क्रीम, ढोकळा, रबडी, शाही खीर, मसालेभात दाल खिचडी, थालीपीठ, चकली भाजणी हे पदार्थ शिकवले जातील.
बांधकाम व्यवसाय व्यवस्थापन
स्थापत्य अभियांत्रिकीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली व्यक्तीही योग्य प्रशिक्षणानंतर बांधकाम उद्योगात आपला व्यवसाय सुरू करू शकते अथवा करिअर घडवू शकते. या पार्श्वभूमीवर तीस दिवसांचे प्रगत बांधकाम पर्यवेक्षक (कन्स्ट्रक्शन सुपरवायझर) प्रशिक्षण २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये बांधकाम उद्योगात नोकरी मिळण्याची शक्यता वाढवणारे, स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रगत ज्ञान देणारे, प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्राचा परिचय, बांधकाम साहित्याचा परिचय, रेखाचित्राचे वाचन व प्रत्यक्ष साइटवर त्याचा सराव, क्षेत्र भेटी, प्रकल्प पूर्वतयारी, कंत्राटदाराच्या कामाची पद्धत, अंदाज व खर्च नियोजन, बांधकाम उद्योगातील १४ महत्त्वाच्या पायऱ्या, सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी व वेळेचे व्यवस्थापन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
‘एआय मास्टरक्लास’ ऑनलाइन प्रशिक्षण
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसायी प्रगती साधू इच्छिणाऱ्या प्रोफेशनल्स आणि उद्योजकांसाठी ‘एआय मास्टरक्लास’ हे विशेष ऑनलाइन प्रशिक्षण १६ नोव्हेंबरपासून आयोजिले आहे. यामध्ये ChatGPT आणि इतर कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा वापर करून आपल्या व्यवसायासाठी उपयुक्त माहिती, कल्पना आणि रणनीती कशा तयार करायच्या तसेच आकर्षक बिझनेस प्रेझेंटेशन, मार्केटिंग मटेरिअल (जाहिराती, कॅम्पेन कंटेंट), सोशल मीडियासाठी पोस्ट्स, रिपोर्ट तयार करण्याचे कौशल्य, बिझनेस मॉडेल्स तयार करण्याच्या पद्धती आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. रिअल-लाइफ केस स्टडीज आणि लाइव्ह अॅक्टिव्हिटीजद्वारे प्रत्यक्ष अनुभवाला यामध्ये प्राधान्य देण्यात येईल. प्रशिक्षणातून सहभागींची उत्पादकता वाढेल, कमी वेळेत अधिक काम पूर्ण करता येईल आणि व्यवसायातील मार्केटिंग, सेल्स व कस्टमर सर्व्हिसमध्ये वेगाने प्रगती साधता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून स्पर्धेत पुढे जाण्याची ही संधी उपयुक्त आहे.
‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२
अधिक माहितीसाठी हा क्यूआर कोड स्कॅन करा