पुणे

मुलांमधील पोटाच्या समस्येकडे नको दुर्लक्ष

CD

पुणे, ता. २० : दूषित पाणी, उघड्यावरील अन्‍न, हवेतील वाढलेली आर्द्रता, उपनगरांमध्‍ये सांडपाण्यामुळे दूषित होणारे पाणीस्‍त्रोत यामुळे लहान मुलांमध्ये पोटाचे तसेच संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. ६ ते १० वयोगटांतील मुलांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून पोट दुखणे, पोट फुगणे, उलट्या, मळमळ आणि जुलाब यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता उपचार घेणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्‍याचे मत बालरोगतज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केले आहे.

पावसाळा आला की रोगराई देखील वाढते. त्‍यामध्‍ये लहानमोठ्यांमध्‍ये संसर्गजन्‍य आजार, कीटकजन्‍य आजार यांच्‍यासह पोटांचेही आजार वाढतात. मुलांची रोगप्रतिकारशक्‍ती कमी असल्‍याने त्‍यांच्‍यामध्‍ये याचा प्रादुर्भाव जास्‍त होतो. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढते, तसेच वाढत्या आर्द्रतेमुळे अन्‍नपदार्थांमध्‍ये जीवाणू आणि विषाणूंची वाढ जलदगतीने होते. ज्‍या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्‍यांना या समस्‍या जाणवतात. रस्त्यावरील उघडे अन्न पदार्थ खाल्ल्याने पोटात दुखणे, मळमळ, उलट्या, अतिसार, गॅस होणे आणि ताप ही लक्षणे दिसून येतात.

याबाबत बालरोगतज्‍ज्ञ डॉ. सिद्धार्थ मदभूशी म्‍हणाले, ‘‘गेल्या तीन-चार आठवड्यांत १० पैकी ७ बालकांना पोटात दुखणे, अतिसार आणि उलट्या अशा समस्या दिसून आल्‍या आहेत. त्‍यावर वेळीच उपचार न केल्यास, शरीरातील पाणी कमी होणे म्‍हणजेच डिहायड्रेशन व थकवा येऊ शकतो. ही लक्षणे दिसल्‍यास मुलांना ‘ओआरएस’ द्यावे. जर ताप व इतर लक्षणे दिसल्‍यास बालरोगतज्‍ज्ञांना दाखवून त्‍यांना प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) आणि हलका व संतुलित आहार द्यावा. उपचारास विलंब केल्यास लक्षणे आणखी वाढू शकतात.’’


व्हिटॅमिन सी फळे खा
पावसाळ्यात थंडीचे प्रमाण सतत कमी-जास्त होत असते. त्याचा परिणाम आपल्या शरीरातील क्रियांवरही होतो. या दिवसांत पचनशक्ती तसेच रोगप्रतिकारशक्ती मंदावते. पालकांनी मुलांची नखे वेळोवेळी कापावी. स्वयंपाक करण्यापूर्वी भाज्या, कडधान्य, डाळी तसेच खाण्यापूर्वी फळे स्वच्छ धुवून घ्यावीत. चिखलात अथवा साठून राहिलेल्या पाण्यात मुलांना अनवाणी पायाने खेळू देऊ नका. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुलांनी पावसाळ्यात व्हिटॅमिन सी असलेल्‍या संत्री, आवळा, पेरू, मोसंबी, पपई, किवी, अननस अशा व्हिटॅमिन सी फळांचा आहारात समावेश करावा. त्‍याने मुलांना आजारांशी लढण्याची क्षमता मिळते, असे आहारतज्ज्ञ अंजली शिंदे यांनी सांगितले.

काय काळजी घ्यावी?
१) मुलांना गाळून, उकळून थंड केलेले पाणी प्‍यायला द्या
२) उघड्यावरील अन्नपदार्थ, कच्चे सॅलड आणि कापून दीर्घकाळ ठेवलेली फळे टाळा
३) घरी शिजवलेले ताजे व गरम अन्न, दहयासारख्या प्रोबायोटिक्ससह हलके जेवण द्या
४) जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुवा
५) जंक फूड खाणे टाळा
६) आजारांची लक्षणे २४ तासांपेक्षा जास्त काळ राहिल्यास बालरोगतज्‍ज्ञांना दाखवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Rummy Video : रमी नव्हे तर 'हा'गेम खेळत होतो… माणिकराव कोकाटेंनी काय दिलं स्पष्टीकरण?

Manikrao Kokate Rummy: कृषीमंत्री कोकाटेंच्या 'रमी' व्हिडिओनंतर ऑनलाईन गेमिंगवर बंदी येणार का? फडणवीस काय म्हणाले होते?

Ahilyanagar: डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री पवारांच्या हस्ते अनावरण: संग्राम जगताप; २७ जुलैला हाेणार अनावरण

WCL 2025 Video: क्रिकेटमध्ये पुन्हा बॉल-आऊट! द. आफ्रिकेने विंडीजवर मिळवला थरराक विजय

Mumbai News: अनधिकृत बांधकामाला अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन! न्यायालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाईची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT