खडकवासला, ता. २० ः झूमकार अॅपवरून भाड्याने घेतलेली मोटार स्वतःची असल्याचे भासवत बनावट कागदपत्रांच्या आधारे ती दुसऱ्याला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेड सिटी पोलिसांनी तांत्रिक तपास करून, १८ लाख रुपये किमतीची मोटार परभणी जिल्ह्यातील मानवत येथून जप्त केली असून, आरोपीला अटक केली आहे.
धायरी येथील प्रसाद अण्णासाहेब कुंभार (वय २९) यांनी त्यांच्या मालकीची किया कॅरेन्स मोटार झूमकार कंपनीकडे नोंदवली होती. ही मोटार बादल मोखारकर या व्यक्तीने २४ ऑक्टोबर २०२४ झूमकार अॅपवरून बुक केली होती. बुकिंगनंतर मोखारकरने १८ डिसेंबरपर्यंत वेळोवेळी संपर्क साधत मुदत वाढविली. मोटारमालक कुंभार यांनी मोखारकरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा फोन बंद लागत होता. कुंभार यांनी झूमकार कंपनीकडे आणि नंतर नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मोखारकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, फास्ट टॅग डेटाचा मागोवा आणि मोबाईल नंबर ट्रेस करून परभणी जिल्ह्यातील मानवत येथे आरोपीला अटक केली. चौकशीत त्याच्याकडून मोटार जप्त करण्यात आली.
मोटारीचा गैरवापर
आरोपीने भाडेतत्त्वावर मोटार घेतल्यानंतर मूळ कागदपत्रानुसार स्वतःचे आधार कार्ड बदलले. नोटरी करून आधार कार्डच्या नावे बनावट ओळखपत्रे तयार केली. त्यानंतर त्याने मोटार स्वतःची असल्याचे भासवत ती दुसऱ्या व्यक्तीला विकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.