लेखक - के. एल. आझाद
शिक्षण घेऊन उच्चशिक्षित होण्याबरोबरच तुम्ही चांगले माणूस बनणेही गरजेचे आहे. कितीही शिक्षण घेतले, पण जर तुम्ही समाजात आणि दैनंदिन जीवनात वावरताना जर योग्य माणूस नसाल तर त्याचा काहीही उपयोग स्वतःसाठी होत नाही व समाजालाही होत नाही.
‘जॉय ऑफ गिविंग’ ही संकल्पना प्रत्येकाने स्वतःमध्ये रुजविणे आवश्यक आहे. आनंद देता आला पाहिजे. याचाच अर्थ चांगला माणूस घडविणे ही पालक, शिक्षक, समाज व शासन या सर्वांची जबाबदारी आहे.
Let's try to be a better human at Clifford आमच्या क्लिफोर्ड इंटरनॅशनल स्कूलचे ब्रीदवाक्य आहे. शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले गेले आहे. शिक्षणामुळे समाजात शांतियुक्त क्रांती निर्माण होते. आजच्या प्रचलित शिक्षणपद्धतीत बदल घडला पाहिजे. याविषयी सर्वांचेच एक मत आहे.
परिवर्तन घडत असताना केवळ विद्यार्थ्यांनी एज्युकेटेड होण्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक दायित्व म्हणून ‘बीइंग ए ह्युमन’ आवश्यक आहे. यास आपण ‘लाइफ स्किल’ असेही संबोधतो. शिक्षण घेऊन उच्चशिक्षित होण्याबरोबरच तुम्ही चांगले माणूस बनणे गरजेचे आहे.
शिक्षण कितीही घेतले, पण जर तुम्ही समाजात आणि दैनंदिन जीवनात वावरताना जर योग्य माणूस नसाल, तर त्याचा काहीही उपयोग स्वतःसाठी होत नाही व समाजालाही होत नाही. ‘जॉय ऑफ गिविंग’ ही संकल्पना प्रत्येकाने स्वतःमध्ये रुजविणे आवश्यक आहे. आनंद देता आला पाहिजे. याचाच अर्थ चांगला माणूस घडविणे ही पालक, शिक्षक, समाज व शासन या सर्वांची जबाबदारी आहे.
परिवर्तन घडत असताना जीवन कसे जगले पाहिजे, हे शिकवणे जास्त आवश्यक आहे, असे माझे मत आहे. आपण एखाद्या निष्णात डॉक्टरकडे गेलो, पण त्याची वर्तणूक, बोलण्याची पद्धत, रुग्णांशी केलेला संवाद जर उद्धट व असभ्य असेल, तर तो डॉक्टर कितीही चांगला असो, रुग्णांचे समाधान होणार नाही.
याचाच अर्थ जीवनामध्ये कसे जगले पाहिजे, हे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच शिकवले पाहिजे. नम्रपणा, सेवाभाव, बंधुभाव या गोष्टी त्यांच्यात रुजविणे, त्यांना त्यांचे महत्त्व पटवून देणे हेसुद्धा फार महत्त्वाचे आहे. शालेय जीवनात मस्तीमौज, खेळणे, हसणे, बागडणे, स्पर्धा करणे हे सर्व असायलाच हवं; पण यास निश्चित काही मर्यादा असली पाहिजे.
यामधून इतरांबद्दल ईर्षा अथवा असूया निर्माण होऊ नये, याची काळजी घ्यावी. शाळेमध्ये जेव्हा मुलांमधील एखादा मुलगा खाली पडला, तर त्याच्यावर हसण्यापेक्षा त्यास आधार देणे महत्त्वाचे आहे. स्पर्धा असावी; पण ती हेल्दी असावी. लहान मुलांमध्ये खोटं बोलण्याचं प्रमाण अधिक आहे. अशा घटना भविष्यात फार मोठ्या प्रमाणावर वाढतात.
त्यामुळे त्यांना कायम खरे बोलणे शिकविले पाहिजे. लहान मुले एकमेकांना कायम चिडवत असतात. खेळणे-बागडणे-चिडवणे छोट्या-मोठ्या मस्तीपुरते ठीक आहे. पण वारंवार चिडवल्यामुळे त्या विद्यार्थ्याबद्दल मनात एक प्रकारची चीड निर्माण होते व त्याचे रूपांतर कधी कधी भयानक गोष्टींमध्येही होते.
यासाठी आपण जपले पाहिजे. डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी काहीही बनावे. ज्या क्षेत्रात आपली आवड आहे, त्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवावे. पण चांगला माणूस बनणे ही सर्वांत मोठी शैक्षणिक पात्रता आहे, असे माझे मत आहे.
सध्याच्या युगाला ‘ज्ञानयुग’ म्हटले जाते. किमान दहा हजार वर्षांची वैभवशाली ज्ञानपरंपरा असलेल्या भारताने आपल्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या बरोबरीनेच आपली बौद्धिक क्षमताही जगाला दाखवून दिली आहे. त्यामुळे ज्ञान-विज्ञानावर आधारित एका नव्या विश्वकल्याणकारी संस्कृतीची देणगी जगाला देण्याची तयारी आपण दाखवत आहोत.
शिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे वैयक्तिक विकास घडवणे आणि सामाजिक प्रगतीस हातभार लावणे. पण शिक्षणाकडे या दृष्टीने बघितले जात नाही.
त्यामुळे सामाजिक सामंजस्य म्हणजे काय? यावर उघडपणे शाळा किंवा महाविद्यालयीन स्तरावर कमी प्रमाणात चर्चा होते. शिक्षणाद्वारे सामाजिक सामंजस्य कसे टिकवता येईल व ते कसे वृद्धिंगत करता येईल, यावर चर्चा होणे गरजेचे आहे.
परस्पर निष्ठा आणि एकता, सामाजिक संबंधांची आणि सामायिक मूल्यांची मजबुती, आपुलकीची भावना, समाजातील व्यक्तींमध्ये समुदाय विश्वास, असमानता कमी करणे व उपेक्षित घटकांच्या मदतीस धावणे, सर्वसामान्य भाषेत समाजातील व्यक्तींमध्ये एकतेची भावना निर्माण होणे,
एकमेकांवरील विश्वासाची पातळी अधिक उंचावणे, विविधतेला स्वीकारून एक प्रकारची सामाजिक सुसंगती व शांतता निर्माण होणे, व्यक्तींमधील आर्थिक व जातीयवादी असमानता दूर होणे, समाजाच्या एकत्रित प्रगतीसाठी प्रयत्नशील असणे, प्रत्येकाच्या मूलभूत मानवी हक्कांचा सन्मान केला जाणे म्हणजेच सामाजिक सामंजस्य तयार होणे.
मनुष्याच्या शरीर, मन, बुद्धीचा विकास करणारी व आत्मविश्वास निर्माण करणारी शिक्षणप्रणाली विकसित करण्याची व त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालक, शाळा व शिक्षकवृंदांची आहे.
शिक्षण असे हवे, की ज्यामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीच्या संस्काराबरोबरच श्रमप्रतिष्ठाही निर्माण झाली पाहिजे. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांत आत्मविश्वास, आत्मगौरव निर्माण झाला पाहिजे.
पण हे करत असताना आपण इतरांचाही आत्मगौरव सांभाळणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना नेहमी मूल्यशिक्षणाद्वारे सामाजिक कर्तव्यांची जाणीव करून देण्यात यावी. कारण त्यासाठी हे वय अतिशय योग्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यास, सामाजिक समस्येबद्दल संबंधित स्वतःची चिंता निर्माण करण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यास सक्षम बनवावे.
योग, उद्योग, प्रयोग आणि सहयोग अशा चार सूत्रांतून शिक्षणाची चढती कमान पाहिजे. कोणत्याही स्तरावरून विद्यार्थी समाजात गेला, तरी तो समाज हिताची भावना घेऊनच जाईल, अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. प्रत्यक्षात खरे उतरल्यावरच आपली शिक्षणपद्धती योग्य आहे, असे म्हणायला हरकत नाही.
समाजाची शिक्षणाकडे पाहण्याची आजची दृष्टी फारशी आशावादी नाही. उलट शिक्षणामुळे विद्यार्थी स्वतःपासून, आपल्यापासून, कुटुंबापासून, गावापासून, समाजापासून, देशापासून विलग होत आहे, अशी भावना निर्माण झाली आहे.
आपलं मूल आपल्याजवळच असलं पाहिजे. आपल्यासमोरच असलं पाहिजे. त्याचं करिअरही आपल्यासमोरच झालं पाहिजे, अशी भावना पालक वर्गात आहे, ती बदलण्याची गरज आहे.
आदर्श विद्यार्थी घडत असताना त्याला आपल्या ज्ञानाच्या मर्यादांची यथार्थ जाणीवही असावी. आपल्याला काय येत नाही, हे कबूल करायला, त्याला कसलीही लाज वाटायला नको.
आपले ज्ञान इतर कुणालाही कधीही द्यायला तयार असतो. मात्र त्या ज्ञानाचा उपयोग विधायक कामासाठीच व्हावा, याबद्दल तो जागरूक व आग्रही असतो.
अर्थातच कमावलेले ज्ञान हे मनुष्याच्या प्रगती, उन्नती व उत्क्रांतीसाठी शेवटी वापरावे लागणार, ही भावना मनात असणे आवश्यक आहे. शिक्षकांनी जी नीतीमूल्ये सांगितली असतात, त्याचे जीवनात अनुकरण करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.