urfi javed Mimicry: उर्फी तिच्या चित्रविचित्र फॅशनस्टाईलमुळे कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. नेटकरी तिच्या बोल्ड फोटोजवर अनेकदा आक्रमकही होतात. मात्र उर्फी ती उर्फीच. मेरी मर्जी म्हणत उर्फी तिला वाटेल ते कपडे घालत सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ पोस्ट करत असते. मात्र उर्फी फिवर चढलेल्या एका तरूणाने उर्फीची अॅक्टिंग करत उर्फी स्टाईलमध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय.
व्हिडिओमधील तरूण अगदी उर्फी स्टाईलचे कपडे घालतो. आणि उर्फी स्टाईलमधेच बोलतो. तसेच उर्फीसारखं चालूनही दाखवतो. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच बघणाऱ्यांना हसू आवरेनासं झालं. उर्फी जावेद ही पोज देताना कायम पापराझींशी बोलताना दिसून येते. अगदी तसंच हा तरूणदेखील व्हिडिओमध्ये बोलताना दिसून येतो.
उर्फी ट्रोल करणाऱ्यांना कायम 'मेरी मर्जी' म्हणत सुणावत असते. हा तरूणदेखील व्हिडिओमध्ये असंच बोलताना दिसून येतो. सोशल मीडियावर उर्फीच्या एकंदरीत वागण्यामुळे आणि तिच्या चित्रविचित्र फॅशनमुळे ती नेटकऱ्यांकडून ट्रोल होताना दिसते. त्यांमुळे तिची हूबेहून नक्कल करणाऱ्या या तरुणाचा व्हिडिओ बघताच नेटकऱ्यांना हसू आले. अनेकांनी या व्हिडिओवर हसणाऱ्या इमोजी कमेंट केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.