धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपतर्फे देशभरात सेवा पंधरवडा राबविण्यात आला. या पंधरवड्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या धुळे महानगर शाखेने विविध उपक्रमांतून उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
याबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजयुमो जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांचा अभिनंदनपत्र देऊन सन्मान केला. (Dhule Metropolis first in state of BJP Yuvak Morcha Excellent performance in service fortnight)
सेवा पंधरवड्यानिमित्त भाजयुमोच्या धुळे शाखेतर्फे रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, मेरी माटी-मेरा देश उपक्रम आदी उपक्रम राबविण्यात आले. त्यात भाजप युवा मोर्चा धुळे महानगराकडून रक्तदान शिबिर घेण्यात आले.
शिबिरात दोनशेवर दात्यांनी रक्तदान केले. तसेच घरोघरी जाऊन मेरी माटी-मेरा देश उपक्रमाची माहिती व नागरिकांकडून परिसरातील माती अमृतकलशात संकलित केली. तसेच धुळे जिल्हा रुग्णालयात युवा मोर्चातर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
पंधरवड्यातील हे सर्व उपक्रम जिल्हाध्यक्ष परदेशी यांच्या नेतृत्वात झाले. भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशने या सर्व कामांची दखल घेतली व या कामगिरीबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष परदेशी यांना अभिनंदनपत्र देऊन सन्मानित केले.
भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विक्रांत पाटील, आमदार नीलेश राणे, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, महामंत्री योगेश मैद, निखिल चव्हाण यांच्यासह भाजयुमो धुळे जिल्हा संघटन सरचिटणीस पंकज धात्रक, सरचिटणीस सचिन पाटील, विनय बेहेरे, चिटणीस गौरव परदेशी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.