नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मृत्युदरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुस्लिम समाजात दफनविधी केला जात असल्याने शहरातील कबरस्तानातील जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे जुने नाशिकमधील नानावली व वडाळागावातील आरक्षित जागा दफनविधीसाठी मुस्लिम समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी नगरसेविका समीना मेमन यांनी मंगळवारी (ता. १४) आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली.
मुस्लिम समाजाच्या दफनविधीसाठी जागा अपुरी
शहरात आतापर्यंत ४ हजार ३७८ कोरोनाबाधितांची संख्या आहे. १८१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुस्लिम समाजातील नागरिकांचा समावेश अधिक आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या खडकाळी येथील रसूलबाग कबरस्तान, चौकमंडई येथील जहांगीर कबरस्तान, द्वारका येथील काझी कबरस्तानमध्ये दफनविधीसाठी जागाच उपलब्ध नाही. शासनाच्या नियमानुसार सर्वधर्मीयांसाठी दफनभूमीसाठी जागा आरक्षित करणे बंधनकारक आहे.
हेही वाचा > धक्कादायक! ऑटो गॅरेज, कोल्ड्रींक्स अन् मोबाईलच्या दुकानात चोरीछुपे सुरू प्रकार...शोध घेताच मोठा खुलासा
नाशिक शिवारातील नानावली येथील गोदावरी नदीलगतचा सर्वे क्रमांक ३१५, ३१६ तसेच वडाळागावातील शंभर फुटी रस्त्यालगत असलेल्या आरक्षण क्रमांक ३७२, सर्वे क्रमांक ६३, ६४, ६५, व सर्वे क्रमांक ६९चा अंशत: भाग ही जागा मुस्लिम समाजासाठी कबरस्तान म्हणून आरक्षित आहे. ती जागा तत्काळ मुस्लिम समाजाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी नगरसेविका समिना मेमन यांनी केली.
दफनविधीसाठी नानावली व वडाळागाव येथील जागा आरक्षित असल्याने सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने जागा मुस्लिम समाजाच्या ताब्यात द्यावी. - समिना मेमन, नगरसेविका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.