Bhandardara Dam : मुसळधार पावसासाठी प्रसिद्ध इगतपुरी - भंडारदऱ्यात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे बहुतांश धरणातून विसर्ग सुरु झाला असताना आज रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने भर पावसात पर्यटकांनी विकेंड पर्यटनासाठी प्रचंड गर्दी केली. इतकी, की, धरणाकडे जाणारे अनेक रस्ते पर्यटकांच्या वाहनांची भरून गेले. भंडारदरा धरणावर सर्वाधीक पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. (tourists on weekends at bhandardara waterfall )
पर्यटन पंढरीत या नगरीत मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आदी मोठ्या शहरांतून येणाऱ्या पर्यटकांची वीकेंडला मांदियाळी पहायला मिळाली. पर्यटकांनी इगतपुरी परिसरातील भावली धरण, कसारा घाट, वैतरणा धरण, अशोका धबधबा, भातसा रिव्हर तसेच भंडारदरा परिसरातील कळसूबाई, रंधा फॉल, सांधन व्हॅली, रतनगड, कुलंग, अलंग या छोट्या- मोठ्या पर्यटनस्थळांचा आनंद घेतला. वीकएंड असल्याने मुसळधार पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने नद्या नाल्यांना पुर आला आहे.
धबधब्याचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहेत.पर्यटकांच्या आकर्षण असलेल्या या धबधब्याकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने काही जास्त गर्दी होत असणाऱ्या धबधब्यांवर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. उर्वरित धबधब्यांवर पर्यटकांनी देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (latest marathi news)
तरीही अनेक ठिकाणी मद्यपी धिंगाणा घालताना दिसले त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना करावा लागत आहे.इगतपुरी - भंडारदरा परिसर हा नयनरम्य व निसर्गरम्य परिसर आहे.पावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य खुलून जात असते. पावसाची बरसात सुरू झाल्यावर बहरलेल्या अनोखे रूप पर्यटकांना अनुभवायला मिळाले . पर्यटकांकडून या परिसरात ओलेचिंब होऊन निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला जात आहे.
ट्रॅफिक जॅम
विकेंड असल्यामुळे परिसरात पर्यटकांची चांगलीच गर्दी झाल्याने अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम झाली होती. गर्दी वाढल्याने गटारी व विकेंड एकत्र आल्याने परिसरातील हॉटेल व्यावसायिकांच्या धंद्यात देखील वाढ झाली. मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पर्यटकांनी योग्य ती खबरदारी घेणे महत्वाचे असणार आहे.
''आम्ही दरवर्षी पावसाळ्यात मुंबईहून इगतपुरी मार्गे धबधब्यांचा व येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी इगतपुरी- भंडारदरा परिसरात येत असतो. या दिवसात येथील निसर्गाचे सौंदर्य खुलून जाते याचा आनंद आम्हाला घेता येतो.''- हरीश गुप्ता, पर्यटक. मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.