541 crore in the air for Baliraja project 
विदर्भ

बळीराजा प्रकल्पासाठी हवेत ५४१ कोटी; दीड वर्षात पूर्ण करण्याचे आव्हान

कृष्णा लोखंडे

अमरावती : अनुशेषग्रस्त भागातील सिंचनाचे प्रकल्प पूर्ण व्हावेत, यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान सिंचन योजना व बळीराजा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्यात. मात्र, योग्यवेळी निधी उपलब्ध होत नसल्याने निम्मी कामे झाल्यानंतर ती रखडली आहेत. बळीराजा सिंचन योजनेंतर्गत ९६ प्रकल्प असून पंतप्रधान सिंचन योजनेत २८ प्रकल्पांचा समावेश आहे. दीड वर्षात राज्याने प्रकल्प पूर्ण न केल्यास केंद्राकडून निधी मिळण्यात अडचणी येण्याचे संकेत आहेत.

पूर्व व पश्‍चिम विदर्भातील लघूसिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेस गती यावी यासाठी ९६ प्रकल्प बळीराजा व २८ प्रकल्प पंतप्रधान सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. या प्रकल्पांसाठी ७५ टक्के कर्ज नाबार्डच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले. कर्जावरील दोन टक्के व्याज केंद्र सरकार भरणार आहे. शिवाय २५ टक्के अनुदान देण्याची तरतूद आहे.

बहुतांश प्रकल्प ५० टक्के पूर्ण झाले आहेत. निधीअभावी आता त्यांची कामे रखडली आहेत. येत्या एक ते दीड वर्षात ती पूर्ण न केल्यास केंद्राकडून निधी मिळण्यात अडचणी येण्याचे संकेत खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. त्यांनी राज्यांनी सर्व प्रकल्प दीड वर्षात पूर्ण करावीत, असा सल्ला दिला आहे. नव्या अटीप्रमाणे केंद्र निधी देण्यास नकार देण्याची शक्‍यता त्यांनी वर्तविली आहे. 

सर्वाधिक अनुशेषग्रस्त असलेल्या अमरावती जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत १८ लघू प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी २ हजार ११५ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरीनंतर या प्रकल्पांची अद्ययावत किंमत २ हजार ६२० कोटींवर पोहोचली असून मार्च २०२० अखेरपर्यंत २ हजार ७८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ५४१ कोटी रुपयांची गरज असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वर्षनिहाय आर्थिक नियोजन करण्यात आले असून त्यानुसार २०२०-२१ मध्ये २२१ कोटी रुपयांची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

अपूर्ण सिंचन प्रकल्प

विभागातील भगाडी, करजगाव, बागलिंगा, पाकनदी, सोनगाव, वाघाडी, सामदा, चंद्रभागा बॅरेज, रायगड, बोरनदी, टाकळी कलान, निम्नसाखळी, निम्न चारघड, भिमडी, झटामझिरी, आमपाटी, चांदी नदी, टिमटाळा या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पांच्या पूर्ततेनंतर २३ हजार ७४९ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सद्यस्थितीत केवळ ५ हजार ६३० हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

Maharashtra Diesel Rules : डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

MLC Election: विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव! शिंदेंनंतर संकटमोचक महाजन दिल्लीला रवाना; कोणत्या जागेवर पेच वाढला?

Junnar Road Crash: डिंगोरे येथे एसटी बस–दुचाकी भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू

KKR vs DC: KL Rahul बरसला! अखेरच्या सामन्यात दिल्लीचे कोलकातासमोर मोठे लक्ष्य; पण शेवट गोड कोण करणार?

SCROLL FOR NEXT