Deputy Chief Minister Ajit Pawar's request not to change the investigation mechanism  
नागपूर

अजित पवार म्हणाले, मुद्दे फक्त कल्पनेतून मांडलेले; तपास यंत्रणा बदलू नका, कारण...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सिंचन घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांमध्ये आजवर कुठलीही त्रुटी आढळून आली नाहीत. तसेच याबाबतची नोंद अभिलेख्यावरसुद्धा नाही. त्यांनी याबाबत कुठलाही ठोस पुरावा न्यायालयामध्ये सादर केला नाही. शिवाय याचिकाकर्ता हा या क्षेत्रातील तज्ज्ञ नाही, असे मुद्दे न्यायालयामध्ये मांडून याचिकाकर्ता तपास यंत्रणेची जबाबदारी पार पाडू पाहत आहे. याचिकाकर्त्याने शपथपत्रातून मांडलेले मुद्दे फक्त त्यांच्या कल्पनेतून मांडलेले आणि गोंधळ निर्माण करणारे आहेत. यामागे मला फक्त त्रास देण्याचा उद्देश आहे. दुष्ट हेतूने ही याचिका दाखल करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये म्हटले आहे. 

विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणातील तपास यंत्रणा बदलवू नये, अशी विनंती करणारे शपथपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केले. राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या तपास यंत्रणाकडून हा तपास काढून स्वतंत्र असणाऱ्या केंद्रीय तपास संस्थांकडे द्यावा, अशी विनंती याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयाला केली होती. मात्र, त्यामध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे पवार यांनी या शपथपत्रामध्ये म्हटले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस महासंचालकांनी दाखल केलेले शपथपत्र अत्यंत मुद्देसुद होते. विभागाचे तत्कालीन पोलिस महासंचालक संजय बर्वे यांनी तपास अधिकाऱ्यांच्या नोंदीचा आधार न घेता शपथपत्र दाखल केले होते. या नोंदी आता पोलिस आयुक्त आणि पोलिस महासंचालकांकडे उपलब्ध असून, त्यांनी त्या शपथपत्रामध्येसुद्धा मांडल्या आहेत. त्यामुळे सीबीआय आणि अंमलबजावणी संचलनालयाकडे या प्रकरणाचा तपास हस्तांतरित करण्याची गरज नसल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. 

विविध आरोप

निम्न पेढी प्रकल्प, रायगड नदी सिंचन प्रकल्प, वाघाडी सिंचन प्रकल्प व जिगाव सिंचन या चार सिंचन प्रकल्पांचे अवैध कंत्राट मिळवून कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला आहे. बाजोरिया कन्स्ट्रक्‍शनचे संचालक संदीप बाजोरिया यांना या प्रकल्पांचे कंत्राट चढ्या दराने देण्यात आले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. श्रीधर पुरोहित यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातर्फे ऍड. जोएल कारलोस, ऍड. रोहित जोशी यांनी बाजू मांडली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT