Ashadhi Akadashi esakal
वारी

Ashadhi Akadashi : एकादशी अन् दुप्पट खाशी! असं करू नका, देवाचे स्मरण करत असा करा आषाढीचा उपवास

एकादशीचा खरा अर्थ असा आहे की आपली ५ ज्ञानेंद्रिय, ५ कर्मेंद्रिय आणि आपलं मन मिळवून ११. अर्थात एकादशी

साक्षी राऊत

Ashadhi Ekadashi 2023 : उद्या २९ जूनला आषाढी एकादशीला प्रारंभ होणार आहे. तेव्हा आषाढी एकदाशीचा उपवास कसा करावा, त्याचे आध्यात्मिक महत्व काय आहे आणि तो देवाचे नामस्मरण करत कसा पार पाडावा ते जाणून घेऊया.

उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहाणं. उप म्हणजे 'जवळ' वास म्हणजे 'राहाणे' हा उपवासाचा खरा अर्थ आहे. मात्र आपण काय करतो? उपवास म्हणजे उपाशी राहाणे नाही. उपवासाच्या नावाने भात, भाज्या, भाकरी आणखी काही वेगळं खात नाही. थोडक्यात आपण रोजचं जेवण जेवत नाही पण फराळाच्या नावाखाली आपण दिवसभर चरत असतो. मग पोट डच्च भरले असल्यावर आपण देवाचे नामस्मरण कसे करणार.

चला तर एकदाशीचा खरा गुढार्थ जाणून घेऊया

एकादशीचा खरा अर्थ असा आहे की आपली ५ ज्ञानेंद्रिय, ५ कर्मेंद्रिय आणि आपलं मन मिळवून ११. अर्थात एकादशी. यांना एकत्र करून एकाच दिशकडे म्हणजे आत्मस्वरूपाकडे इश्वराकडे वळवणे म्हणजे एकादशीचा उपवास करणे.

संतानी त्यांच्या अभंगात असे वर्णन केलेच आहे की देव ही पंढरी आणि आत्मा हे पांडुरंग. मग आपण एकादशीला कसाप्रकारे उपवास केला पाहिजे जाणून घ्या.

एकादशीच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी उपवासात अल्पआहार घेतला पाहिजे. मात्र उपाशी राहू नये. ज्ञानेश्वरी माऊलींनीसुद्धा हे ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे. योग्य आहार असेल तरच आपलं मन एकाग्र होतं. आणि आपल्या उपवासदेवतेची पूजा मनोभावे करता येते किंवा ज्यांना आत्मज्ञान झालं आहे, आत्मदर्शन झालं आहे त्यांना अनुसंधान साधणं सोपं जातं. (Ashadhi Wari)

म्हणून एकादशीचा किंवा कुठलाही उपवास करताना कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन एकत्र करून उपासदेवतेच्या चरणांकडे लावावे म्हणजे देवाचा उपवास केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं.

वारकरी संप्रदायात एक नियम आहे. एकादशीचा उपवास धरताना म्हणतात करायला दशमी, राहायला एकादशी आणि सोडवायला द्वादशी. याचा गुढार्थसुद्धा असाच आहे की धरायला दशमी म्हणजेच पाच ज्ञानेंद्रिय अधिक पाच कर्मेंद्रिय अधिक दहा म्हणजेच दशमी. (Fast)

असा एकादशीचा उपवास तुम्हाला करता आला तर देव पावलाच समजा. आता या उपवासाच्या दिवशी काहीही न खाता शरीरालाच नाही तर मनालासुद्धा वेगवेगळ्या विकारांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून सत्संग करावा असं शास्त्रसुद्धा सांगतं. विषयांची आसक्ती दूर करण्यासाठी उपवासाच्या दिवशी मन हरिकिर्तनात, भजनात रमवावं. अनन्यभावाने भगवंताला शरण जाऊन नामस्मरण करावं.

उपवासांच्या पदार्थांचं काय तुम्ही ते इतर दिवशीही बनवून खाऊ शकता. पण उपवासाचा हेतू साध्य करायचा असेल तर तनामनाचा उपवास घडणे अर्थात लंघन घडणे आवश्यक आहे. मग उपवासाच्या दिवशी काय खावं आणि काय खाऊ नये असा प्रश्न अजूनही असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी शक्यतो काहीही खाऊ नये. पण प्रत्येकाच्या शरीरयष्टी आणि क्षमतेनुसार त्याला जसं झेपेल तसा अल्पआहार घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात वाहतूक पोलिसानं गळफास घेऊन संपवलं जीवन; पत्नीनं अनेक वेळा फोन केला, शाळा सुटल्यावर मुलंही घरी परतली, पण..

Akhad Special Recipe: अस्सल मराठमोळ्या झणझणीत चवीसह बनवा आखाड स्पेशल 'मटण खर्डा'! लगेच नोट करा ही सोपी रेसिपी

PM Dhan Dhanya Krishi Yojana: पंतप्रधान धन धान्य कृषी योजना काय आहे? जाणून घ्या शेतकऱ्यांना याचा लाभ कसा मिळेल

VIDEO : भरधाव येणाऱ्या कारने होमगार्डला बोनेटवर लटकवत नेलं फरफटत; थरारक घटना CCTV मध्ये कैद, जीव वाचवण्यासाठी तो...

Pune Crime : भोंदू ज्योतिषाने तरुणीला एकांतात नेले अन्... धक्कादायक घटनेने पुणे हादरले

SCROLL FOR NEXT