
या ॲडल्ट फिल्म अभिनेत्रींनी बदललंय आपलं करियर, आता आहेत...
गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेटचा वापर वेगाने वाढलाय.त्यामुळे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील व्हिडिओज,फोटोज सहजपणे उपलब्ध होतात.अनेकांनी या पार्श्वभूमीवर ॲडल्ट फिल्ममधे काम करणे निवडले.ॲडल्ट चित्रपटांतून काही अभिनेत्रींना प्रसिद्धी तर मिळालीच. पण लोकांच्या त्यांच्यासाठी असणाऱ्या वाईट टीकाटिपण्यांनाही त्यांना सामोरे जावे लागले.काही ॲडल्ट फिल्म अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी इन्डस्ट्री सोडून त्यांच्या करियरला नवी दिशा दिली आहे.आता त्या 'ॲडल्ट फिल्म स्टार्स' राहिल्या नाहीत.

'साशा ग्रे' ही एकेकाळी जगातील सर्वात बीझी पॉर्न स्टार होती.ॲडल्ट फिल्ममधील कामासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.पण तीच्या २००९ च्या 'द गर्लफ्रेंड एक्सपीरियन्स' या हिट वेब सिरीजने सर्वांना थक्क केले.तिने एचबीओच्या हिट सीरिज 'एंटूरेज'मध्येही भूमिका साकारली होती.तिने 'न्यू सेक्स' आणि 'द ज्युलिएट सोसायटी' सारख्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत.आता ती एक लेखिका देखील आहे.

'सनी लिओनी' उर्फ 'करणजीत कौर वोहरा' हिला आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक मानले जाते.बीग 'बॉस ५' मधे येण्यापूर्वी आणि नंतरही या अभिनेत्रीने अनेक ॲडल्ट फिल्ममधे काम केले.२०१६ मध्ये बीबीसीच्या १०० सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीतही स्थान मिळवले होते.

ॲडल्ट फिल्मच्या क्षेत्रात मेरी रोजने भन्नाट प्रसिद्धी मिळवल्यानंतर दुसऱ्या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.२००७ मधे मेरीने चित्रपटाचं क्षेत्रं सोडलं.२०२१ मधे तिने कॅलिफोर्नियाच्या 'गव्हर्नर' पदासाठी निवडणूकही लढवली.

'गेम ऑफ थ्रोन्स' मधील भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी 'सिबेल केकिल्ली' ही एके काळी पोर्न स्टार होती.एका वृत्तानुसार सिबेलने तीच्या कुटुंबियांपासून तीचे ॲडल्ट फिल्ममधील काम लपवले होते.नंतर जेव्हा तीला जर्मन चित्रपटांमधे काम मिळू लागले तेव्हा एका रिपोर्टमधून तीचा भूतकाळ बाहेर पडला.ज्याचा सिबेलने एका मोहिमेअंतर्गत निषेध केला.तेव्हापासून ती महिलांच्या हक्कांसाठी लढणारी वकिल बनली आहे.

'मिया खलिफाने' पॉर्न फिल्ममधे काम करून प्रसिद्धी मिळवली.या अभिनेत्रीने हिजाब घातल्याबद्दल तिची प्रचंड निंदा झाली.तिच्या एका वादग्रस्त व्हिडिओवरून तिला इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरियाकडून जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या.इंडस्ट्री सोडल्यानंतर तिने काही काळ स्पोर्ट्स समालोचक म्हणून काम केले.
Web Title: These Adult Film Stars Have Changed Their Stream Now They Are No More Adult Film Starssunny Leonesasha Gray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..