5 सर्वात महागडे फोन, किंमत ऐकून डोळे फिरतील

सकाळ डिजिटल टीम

आयफोन वैशिष्ट्यांसह Caviar iPhone 12 Pro Pure Gold हा जगातील सर्वात महागड्या स्मार्टफोनपैकी एक आहे. Caviar iPhone 12 Pro Pure Gold चे फक्त 7 फोन बनवले गेले आहेत. या फोनची किंमत $122,000 (91 लाख रुपये) आहे. या फोनची खास गोष्ट म्हणजे यात 18 कॅरेट सोन्याने हिरे बसवले आहेत.

Samsung Galaxy S21 Ultra Caviar Edition देखील जगातील सर्वात महागड्या स्मार्टफोनच्या यादीत येतो. Caviar चा हा दुसरा सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. हे गोल्ड, डायमंड, टायटॅनियम आणि प्युअर लेदरमध्ये बनवण्यात आले आहे. या फोनच्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 20 हजार डॉलर (14.5 लाख रुपये) आहे.

Goldvish Le Million देखील करोडो रूपयांमध्ये येतो. या फोनला 2006 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात महागडा फोन म्हणून घोषित केले होते. या फोनच्या बॉडीमध्ये 1.20 लाख हिरे तसेच 18 कॅरेट सोन्याचा वापर केला आहे. याची किंमत सुमारे 7.7 कोटी रुपये आहे.

Gresso lossers Las Vegas jackpot फोन फोनच्या मागे 200 वर्षे जुने आफ्रिकन ब्लॅकवुड बसवले आहे. याशिवाय, यात 45.5 कॅरेट काळे हिरे आणि 180 ग्रॅम सोने आहे. या स्मार्टफोनची किंमत जवळपास 7.1 कोटी रुपये आहे.

Diamond Crypto हा फोन ऑस्ट्रियन ज्वेलर पीटर एलिसन आणि रशियन फर्म जेएससी एन्कोर्ट यांनी तयार केला आहे. या फोनच्या बाजूला 50 हिरे असून, याचा लोगो 18 कॅरेट सोन्यापासून बनवला आहे. या फोनची किंमत जवळपास 9.3 कोटी आहे. या फोनमध्ये हाय लेव्हल एन्क्रिप्शनदेखील देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.